ग्रीन राईड 2 च्या निमित्ताने मिलिंद सोमणची फिटन...

ग्रीन राईड 2 च्या निमित्ताने मिलिंद सोमणची फिटनेस जागृती चर्चा (Milind Soman Creates Fitness Awareness On The Occassion Of Green Ride 2)

फिटनेस आणि आपल्यापेक्षा 26 वर्षांनी लहान असलेल्या मॉडेलशी लग्न करून चर्चेत असलेल्या मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमण आता पुन्हा मुंबई ते मंगलोर सायकल वरून फेरी करण्यास सज्ज झाला आहे.
फिटनेस बाबत जागरूक असलेला मिलिंद पर्यावरणवादी आहे. म्हणूनच त्याने प्रदूषण समस्येबाबत जागृती निर्माण करण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या ग्रीन राईड 2 या मोहिमेत भाग घेतला आहे. त्यानुसार सोमवारी मिलिंद मुंबई -पुणे -कोल्हापूर -बंगलोर -मंगलोर अशी पश्चिम क्षेत्रात सायकल स्वारी सुरु करणार आहे.


या ग्रीन राईड 2च्या निमित्ताने आपलीकडील वाढते प्रदूषण व पर्यावरण जागृती या बाबत संवाद साधला. ” ही गंभीर समस्या निर्माण करण्यासाठी आपण सगळेच जबाबदार आहोत “असे सांगून तो पुढे म्हणाला,” एक ग्राहक म्हणून आपण खूप खरेदी करतो व त्याची वेष्टने टाकून कचरा वाढवतो. ही उठसुठ खरेदी करण्याची गरज आहे का? हा प्रश्न स्वतःलाच विचारा. तसेच आपल्या गरजा किती वाढवाव्या याचाही विचार करायला हवा. ग्रीन राईडची मोहीम आपली एक लहानशी कृती जगात बदल घडवून आणेल असा संदेश देत आहे. “
आपल्या फिटनेस बाबत तो म्हणाला, “हेल्थ इज वेल्थ या म्हणीचा लोकांना विसर पडला आहे. मी दररोज फक्त 15-20 मिनिटे व्यायाम करतो. एकाच वेळी नव्हे tr जमेल तेव्हा करतो. मी कोणत्याही जिममध्ये जात नाही. हे तुम्हालाही जमू शकेल. दररोज 1 मिनिट पुशप्स काढा. त्यातूनही फिटनेस साधता येईल.” गेल्या वर्षी ग्रीन राईड 1 मोहिमे अंतर्गत मिलिंदने मुंबई -दिल्ली असा 1000 किलोमीटर सायकल प्रवास केला होता.


मिलिंदच्या स्वरात स्वर मिसळून बँक ऑफ बडोदाचे मॅनेजिंग डायरेक्टर व सि. ई. ओ. संजीव चढढा यांनी आपल्या प्रदूषण विरोधी मोहिमेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. स्वतः योग अभ्यास नियमित करत असल्याचे सांगितले.