मिकाला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने मारले होते का...

मिकाला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने मारले होते कानाखाली, फसवणूक केल्यामुळे भोगावी लागली शिक्षा (Mika Singh Was Slapped Hard By Ex, Was Punished For Cheating)

गायक मिका सिंग सध्या त्याच्या  ‘मिका दी वोहटी’ या शो मुळे चर्चेत आहे. या शोमध्ये त्याचे स्वयंवर दाखवण्यात येत आहे.  मिकासोबत लग्न करण्याची स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुणी या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. यात आतापर्यंत काही जणी बाद झाल्या तर काही अजूनही मिकाची पत्नी होण्यासाठी झटत आहेत. ‘’मी आता सेटल होऊ इच्छितो ‘’असे मिकाने या शो दरम्यान सांगितले. मिका त्याच्या आयुष्यात गर्लफ्रेंडमुळे अनेक संकटांना सामोरे गेला होता त्यामुळे या शोमधून त्याला त्याच्या आयुष्याची जोडीदार मिळेल अशी आशा आहे.

मिकाने सांगितले की,’’ करीअरच्या सुरुवातीला मी एका मुलीला डेट करत होतो तेव्हा माझी अनेक गाणी हिट झाली होती. माझा महिला चाहतावर्ग सुद्धा खूप मोठा होता. त्यानंतर मी माझ्या एका सुंदर चाहतीला डेट करण्यास सुरुवात केली. तेव्हा मी त्या मुलीचा नंबर राकेश नावाने सेव्ह केला होता. एकदा माझ्या गर्लफ्रेंडसमोर राकेशचा (दुसऱ्या गर्लफ्रेंड) फोन आला. तेव्हा मी तो फोन उचलला नाही. माझ्या गर्लफ्रेंडला माझ्यावर संशय आला म्हणून तिने मला त्या नंबरवर जबरदस्ती पुन्हा फोन करुन स्पिकरवर बोलायला लावले. तेव्हा माझे सगळे गुपित उघड झाले. तिने माझ्या जोरदार कानाखाली मारली होती. त्यावेळी मला गर्लफ्रेंड शब्दाचा खरा अर्थ समजला. ‘’

मिकाने पुढे सांगितले की, ‘त्यानंतर माझी गर्लफ्रेंड माझ्यावर सतत लक्ष ठेवून असायची. जेव्हा मी कोणत्याही शो साठी बाहेर जायचो तेव्हा ती तिथल्या हॉटेल स्टाफकडे माझी चौकशी करायची. मी तिला सगळ्या गोष्टी सांगूनच करायचो पण तिचा माझ्यावर विश्वासच उरलेला नव्हता त्यामुळे ती मला क्रॉस चेक करायची.’

मिकाची जोडीदार बनण्यासाठी सध्या अनेक मुलींमध्ये स्पर्धा चालू आहे.

मिका नेहमीच मजामस्ती करत असतो. पण त्याच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा तो त्याच्या शाळेतल्या एका मुलीच्या प्रेमात पडला होता. पण तिच्या घरच्यांना मिका पसंत नव्हता म्हणून त्यांनी त्यांच्या नात्याला परवानगी दिली नाही. नंतर मिका त्या मुलीच्या लग्नात जाऊन गाणे गायला होता. पण त्यानंतर तो खूप रडल्याचे मिकाने सांगितले. सध्या मिका शो मधून त्याच्या आयुष्याची जोडीदार शोधत आहे त्यामुळे प्रेक्षकांनासुद्धा त्याची जोडीदार कोण असेल याची उत्सुकता आहे.