गायक मिका सिंगला त्याची नवरी मिळाली, स्वयंवराच्...

गायक मिका सिंगला त्याची नवरी मिळाली, स्वयंवराच्या महाअंतिम सोहळ्यात आकांक्षा पुरीने मारली बाजी (Mika Di Vohti: Mika Singh has finally chosen his ‘bride’, Akanksha Puri will be his life partner)

गेले दोन महिने गायक मिका सिंगचे स्वयंवर हा एक चर्चेचा विषय बनला होता. आता शेवटी मिकाला त्याची जीवनसाथी भेटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिकाने त्याची जुनी मैत्रीण आकांक्षा पुरीची आपली पत्नी म्हणून निवड केली आहे.

आकांक्षा पुरी, प्रणितिका दास आणि नीत महल हे तीन स्पर्धक महाअंतिम फेरीपर्यंत पोहचले होते. या तिन्ही मुली मिकाला खूप आवडल्या होत्या पण त्यांच्यात आकांक्षाने बाजी मारली. खरेतर आकांक्षा आणि मिका यांची आधीपासून एकमेकांशी खूप चांगली मैत्री होती. त्यामुळे जीवनसाथी म्हणून आकांक्षाच योग्य आहे असे मिकाला वाटले.

मिकाच्या स्वयंवरामध्ये सुरुवातीला देशातील वेगवेगळ्या भागांतून 12 मुली आल्या होत्या. शो जसजसा पुढे गेला तशा काही वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्या. आकांक्षाने सुद्धा वाइल्ड कार्ड एन्ट्री केली होती. ते दोघेही एकमेकांचे जुने मित्र असल्याने त्यांना एकमेकांच्या आवडीनिवडी माहित होत्या. जेव्हा आकांक्षाने मिकाबद्दलचे प्रेम व्यक्त केले तेव्हा मिकाने सुद्धा तिच्या प्रेमाला होकार दिला.

पण मिका कॅमेऱ्यासमोर आकांक्षासोबत लग्न करणार नाही. मिकाला आधी तिच्यासोबत काही वेळ घालवायचा आहे. त्यानंतरच तो तिच्यासोबत लग्न करणार आहे. मिका आकांक्षाच्या कुटुंबाला सुद्धा भेटला असून दोघांनी घरच्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.

मिका दी वोटीचा महाअंतिम सोहळा आज म्हणजे 25 जुलैला प्रसारित होणार आहे. आकांक्षा पुरी यापूर्वी बिग बॉस फेम पारस छाबडाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण पारस बिग बॉसमध्ये गेल्यावर तो माहिरा शर्माच्या प्रेमात पडला. आकांक्षासोबत त्याचा ब्रेकअप झाला असून या ब्रेकअपमधून सावरण्यासाठी तिला मिकाने खूप मदत केली होती.