‘मी पुन्हा येईन’ वेबसीरिज ओटीटीवर प...

‘मी पुन्हा येईन’ वेबसीरिज ओटीटीवर प्रदर्शित (“Mi Punha Yein” A political Satire Web Series Released On OTT)

राजकारणातील साधारण परिस्थितीवर मार्मिक पद्धतीने भाष्य करणारी ‘मी पुन्हा येईन’ वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी’वर प्रदर्शित झाली असून अरविंद जगताप लिखित, दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, भारत गणेशपुरे असे दमदार कलाकार आहेत.

सध्या ‘मी पुन्हा येईन’चे तीन एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. यात सत्तेसाठी पक्ष वरिष्ठांना विनवण्या, सत्तानाट्य, मंत्रीपदासाठी राजकारण्यांची फसवणूक, आमदारांची पळवापळवी हे सर्व विनोदी शैलीत दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, “सध्याच्या राजकारणाशी याचा काहीही संबंध नसून निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने याची निर्मिती करण्यात आली आहे. राजकारणामागील गोष्टी या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील.”

प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” विनोदीशैलीत निर्मित केलेली ही वेबसीरिज श्रोत्यांना खिळवून ठेवणारी आहे. राजकारणात कधीही काहीही घडू शकते, हे वेबसीरिज पाहिल्यावर कळेलच.”

प्लॅनेट मराठी, गौतम कोळी व जेम क्रिएशन्सने ‘मी पुन्हा येईन’ची निर्मिती केली आहे.