साडेपाच कोटी रुपये किंमतीची मर्सिडिजची ब्लॅक सि...

साडेपाच कोटी रुपये किंमतीची मर्सिडिजची ब्लॅक सिरीजमधील नवी सुपर कार दाखल (Mercedes Launches New Black Series Royal Super Car Valued Rs. 5.5 Crores)

मर्सिडीज या आलिशान मोटारींच्या कंपनीने आपली एएमजी जीटी ब्लॅक सिरीजमधील नवीकोरी सुपर कार नुकतीच भारतात दाखल केली. साडेपाच कोटी रुपये किंमतीची ही नवी स्पोर्ट्स कार सुपर कार्सचे वेड असलेल्या भुपेश रेड्डी या श्रीमंत उद्योजकास, कंपनीचे संचालक मार्टिन श्वेन्फ यांनी एका समारंभात दिली.

या नव्या सुपर कारची अनेक वैशिष्ट्ये असून अत्यंत आधुनिक एरोडायनॅमिक्सचा वापर त्यात करण्यात आला आहे. सात ड्युअल क्लच ट्रन्समिशनने ती युक्त असून एएमजी8 सिरीजचे शक्तिशाली इंजिन तिला बसविण्यात आले आहे. या राजेशाही कारचे अंतरंग उच्च दर्जाच्या सीट्स आणि काळ्या व नारिंगी रंगाने सजले आहे. शक्तिशाली इंजिन आणि टॉर्कच्या सहाय्याने सुपर कार 3.2 सेकंदात शून्य ते शंभर किलोमीटर्स वेग गाठू शकते.

ही रेस कार असल्याने तिचा सर्वोत्तम वेग, ताशी 325 किलो मिटर्स पर्यंत जाऊ शकतो. सदर स्पोर्ट्स सुपर कार ज्या भुपेश रेड्डी या उद्योजकांना देण्यात आली त्यांच्याकडे एसएलएस एएमजी, जी ६३ अशा श्रेणीतील तसेच इतर टॉप एन्ड मर्सिडीज गाड्यांचा संग्रह आहे. म्हणूनच आपल्या या खास ग्राहकाला कंपनीने ही नवी आलिशान, महागडी कार देण्यास पसंती दिली.