४६ वर्षांची झाली तरी अजून सुष्मिता सेन अविवाहित...

४६ वर्षांची झाली तरी अजून सुष्मिता सेन अविवाहित का आहे? मुलांसाठी तिने लग्न केले नाही का? ‘तीनदा लग्न होता होता राहिले…’ स्वतः सुश्मितानेच केला खुलासा (‘Men In My Life Were A Letdown, My Kids Were Not A Problem…’ Sushmita Sen Reveals The Only Reason Why She Never Got Married)

सुष्मिता सेन (Sushmita Sen) एक सुंदर, बोल्ड, बिनधास्त आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री आहे. तिने तिच्या खासगी आयुष्यातील कोणतेही नाते कधीही लपवले नाही किंवा त्या नात्यांपासून विभक्त झाल्याबद्दल तिने कोणाला दोषही दिला नाही. ती तिची नाती अतिशय सभ्यतेने हाताळते आणि त्याहीपेक्षा ती अतिशय प्रेमाने सिंगल मदर (single mother) ची भूमिका निभावत आहे. दोन मुली आणि एक मुलगा दत्तक (adopted) घेतल्यानंतर सुश्मिता उत्तम प्रकारे त्यांचे संगोपन करत आहे.

४६ वर्षांची सुश्मिता तीन मुलांची आई असली तरी अजूनही ती अविवाहित आहे. तिला लग्नासाठी तीन संधी मिळाल्या परंतु देवकृपेने मी वाचली असे सुश्मिता म्हणते. माझ्या आयुष्यात ज्या व्यक्ती आल्या, त्यांचे मी आणि माझ्या मुलांनी सन्मानाने स्वागत केले. परंतु या व्यक्ती माझ्या जबाबदाऱ्या आणि प्राथमिकता समजू शकले नाहीत, त्यामुळे कोणाशीच माझे नाते लग्नापर्यंत पुढे जाऊ शकले नाही, असे सुश्मिता म्हणते.

सुश्मिताने पुढे असेही सांगितले की, तिने पहिली मुलगी रेने हिला दत्तक घेतले तेव्हा तिचे कोणाशीच काहीही संबंध नव्हते. मात्र त्यानंतर तिच्या जीवनात जे कोणी आले, ते तिला समजू शकले नाहीत. त्या व्यक्तीने माझ्या जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात असे मला कधीही वाटले नाही आणि मी तशी कोणाकडून अपेक्षाही केली नाही. परंतु कोणी मला माझ्या जबाबदाऱ्यांपासून दूर करू पाहत असेल तर ते मला चालणार नव्हते. अजूनही माझ्या मुलींना माझी गरज आहे. सुदैवाने मला माझ्या आयुष्यात खूप मजेशीर आणि अद्‌भूत व्यक्ती भेटल्या आहेत. मी लग्न केले नाही याचे एकमेव कारण म्हणजे त्या व्यक्ती निराश होत्या. माझ्या मुलांशी त्याचा काहीही संबंध नव्हता.

माझे लग्न होण्याचे तीनदा प्रसंग आले पण दरवेळी देवाच्या कृपेने मी वाचले. कारण ते काय होते ते मी सांगू शकत नाही, एक प्रकारे ते संकटच होते परंतु देवाने माझे रक्षण केले. तोच माझ्या मुलांचे रक्षण करत आहे आणि मला चुकीच्या नात्यात गुंतण्यापासून रोखत आहे.

अलीकडेच सुश्मिताचे रोहमन शॉलसोबतचे नाते संपुष्टात आहे होते परंतु तरीही ते दोघे अजूनही काही प्रसंगी एकत्र दिसतात. त्यांच्यातील मैत्री अजूनही होती. रोहमनसोबत सुश्मिताचे लग्न होईल अशी सगळ्यांना खात्री होती, परंतु तसे घडले नाही. याआधीही रणदीप हुड्डा, विक्रम भट्ट पासून वसीम अक्रम पर्यंत अनेकांसोबत सुश्मिताचे नाव जोडले गेले आहे. बऱ्याच काळानंतर सुश्मिता आर्या नावाच्या वेब सिरीजमध्ये दिसली. या वेब सिरीजमधील सुश्मिताच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले. खऱ्या आयुष्यातही सुश्मिताच्या वागण्या-बोलण्याची चाहते प्रशंसा करत असतात.