सौंदर्य प्रसाधनांचा भव्य मेळावा (Mega Event Of ...
सौंदर्य प्रसाधनांचा भव्य मेळावा (Mega Event Of Beauty Products)


आजच्या काळात सौंदर्यप्रसाधन उद्योगाला सुगीचे दिवस आल्याची चिन्हे दिसत आहेत. कारण हा व्यवसाय वेगाने वाढत असल्याचे प्रतिपादन मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या कॉस्मोप्रोफ इंडिया, या मेळाव्यात करण्यात आले. सहारा हॉटेलात झालेल्या या दोन दिवसांच्या भव्य मेळाव्यात (Mega Event Of Beauty Products) जागतिक ख्यातीच्या सौंदर्यविषयक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी भाग घेतला होता. हॉटेलच्या २००० चौरस मीटरच्या क्षेत्रफळात २५००० ब्युटी ऑपरेटर्सना उत्तम दर्जाच्या व्यवसाय अनुभवाची हमी देण्यात आली. ॲमेझॉन, मिंत्रा, पर्पल, मॅरिको, हिंदुस्तान युनिलिव्हर, लॅक्मे लिव्हर, कामा आयुर्वेद इत्यादी बड्या सौंदर्य विषयक उत्पादने करणाऱ्या कंपन्यांचा त्यात सहभाग होता.

कॉस्मोप्रोफ इंडियाच्या या भव्य मेळाव्यात आदर्शवत् बिझनेस टू बिझनेस असे धोरण ठरवले होते. विविध ब्रॅन्डस्, खरीददार, किरकोळ व ठोक विक्रेते यांना या ठिकाणी एकत्र आणण्यात आले होते. सौंदर्य प्रसाधनांसह, परफ्युम्स्, पॅकेजिंग, एस्थेटिक्स, स्पा, केस, नखे आणि नैसर्गिक उत्पादनांच्या कंपन्या; यांनी या मेळाव्यात आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व व्यवसाय केला. तसेच मार्गदर्शक वर्कशॉप्स् घेण्यात आले.


लॅक्मे लिव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कराज शेणई व इतर मान्यवरांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले.