‘कच्चा बादाम’ हे गाणे गाऊन इंटरनेटवर खळबळ माजवण...

‘कच्चा बादाम’ हे गाणे गाऊन इंटरनेटवर खळबळ माजवणारे भुबन बादायकर कोण आहेत? (Meet the ‘Kachcha Badam’ singer Bhuban Badaykar, who has become new Internet sensation)

सोशल मीडियावर अलीकडे अल्लु अर्जुनच्या पुष्पानं साऱ्यांना वेड लावलं असलं तरी, आणखी एकजण आहे ज्याच्या व्हिडिओनं साऱ्या देशाला आपल्या गायकीनं चकित केलं आहे. त्या गाण्याचे नाव ‘कच्चा बादाम’ असं आहे. ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याला मिळणारा चाहतावर्गही मोठा आहे. आतापर्य़त लाखोंच्या संख्येनं त्या गाण्याला व्हयुज मिळाले आहेत.

बंगाली भाषेतील या गाण्याचे आतापर्यत देशातील वेगवेगळ्या भाषांमध्ये व्हर्जन व्हायरल झाले आहे. काहींनी त्यावर रील्सही बनवले आहेत. पण ज्यावेळी आपण ओरिजनल गाणे ऐकतो तेव्हा त्या गायकाच्या प्रेमात पडल्यावाचून राहत नाही. हे गाणं गाणाऱ्या गायकाने रातोरात सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. जाणून घेऊया हा गायक कोण आहे आणि त्याचं गाणं इतकं व्हायरल का झालंय?

कच्चा बादाम हे गाणं गाणाऱ्या मूळ गायकाचं नाव भुवन बादायकर असे आहे. पश्चिम बंगालमधील कुरालगुजरी गावांत राहणारा भुबन समुद्रकिनारी शेंगा विकण्याचे काम करतो. एका वेगळ्याच अंदाजात कच्चा बादाम… हे गाणं गात शेंगा विकून दिवसाला २०० ते ३०० रुपये कमावणाऱ्या भुवनच्या या गाण्याची सगळीकडे चर्चा आहे. या गाण्याला सोशल मीडियावरुन आतापर्यत लाखो व्ह्युज मिळाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये शेंगाना बदाम असं म्हटलं जातं. त्यामुळे भुवन आपल्या गाण्यात शेंगाना बदाम म्हणताना दिसतो आहे.

आपल्या गाण्याने इंटरनेटवर खळबळ माजवली असल्याची भुबनला जराही कल्पना नव्हती. हे गाणं जेव्हा प्रदर्शित झाले तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक त्यांना भेटायला आले. त्यामध्ये काही सेलिब्रेटींचा देखील समावेश होता. त्यानंतर त्यांना आपण इतके प्रसिद्ध झालो असल्याचा अंदाज आला. या व्हिडिओमुळे आज आपण घराघरात ओळखले जातोय याचा त्यांना आनंद आहे. मात्र या सगळ्यामुळे त्यांची गरीबी काही दूर झालेली नाही. कुणीही त्यांना पैसे दिलेले नाही. उलट भुबन यांना गावकऱ्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं आहे.

भुबन यांचे वय ५० वर्षे आहे. त्यांना दोन मुलगे आणि एक सून आहे. त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. शेंगदाणे विकून ते आपले कुटुंब चालवतात. पण प्रसिद्ध झाल्यापासून लोक त्यांच्याकडे येतात, त्यांचे गाणे रेकॉर्ड करतात आणि नंतर त्यांना ५०० किंवा २-३ हजार रुपये देऊन निघून जातात. एवढेच नाही तर कोणताही कार्यक्रम असो किंवा सरस्वती पूजन असो, लोक भुबन यांना गाण्यासाठी बोलावतात आणि त्यासाठी पैसेही देतात. मात्र म्युझिक व्हिडिओसाठी त्यांना कमाईच्या ४०-६० टक्के मानधन देण्याचे मंजुर करुनही अद्याप काहीही दिले गेले नसल्याने ते दुखावले गेले आहेत.