आई आणि वडिलांचं आडनाव लावणारी स्टार मुले (Meet ...

आई आणि वडिलांचं आडनाव लावणारी स्टार मुले (Meet Star Kids With Their Mom-Dad’s Surname)

बॉलिवूड मधील तारकांची काही मुले अशी आहेत, जी आपल्या नावामागे आई किंवा बाबाचं आडनाव लावतात. तर आई-बाबा अशी दोघांचीही आडनावे, आपल्या नावामागे लावणारी स्टार्सची काही मुले आहेत.
तारा बेदी कौशल
मंदिरा बेदी आणि तिचे दिवंगत पती राज कौशल यांनी गेल्या २८ जुलै रोजी एका लहान मुलीला दत्तक घेतले होते. या जोडप्याने मुलीचं नाव तारा बेदी कौशल असं ठेवलं. त्यामुळे तारा, आपल्या नावामागे आई व बाबा असं दोघांचंही आडनाव वापरते.

सामिशा शेटटी कुंद्रा
शिल्पा शेटटी आणि उद्योगपती राज कुंद्रा गेल्याच वर्षी एका मुलीचे पालक झाले. सरोगसी पध्दतीचा वापर करून शिल्पाने या मुलीस जन्माला घातले. या जोडप्याला व्हियान नावाचा मोठा मुलगा पण आहे.

हा व्हियान आपल्या नावामागे कुंद्रा हे वडिलांचे आडनाव लावतो. पण समीशा या मुलीला तिच्या मम्मी व पप्पाच्या आडनावाने ओळखले जाते. शिल्पा आणि राज यांची ही लाडकी कन्या सामिशा शेटटी कुंद्रा अशा दोन आडनावांनी ओळखली जाते.

मेहर धुपिया बेदी
नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या ३ वर्षांच्या मुलीचे नाव मेहर आहे. अलीकडेच या मेहरचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला. मात्र ही लहानगी मेहर आपल्या नावामागे आई व बाबा असं दोघांचंही आडनाव लावते.

इमारा मलिक खान
‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारा इमरान खान बॉलिवूडमध्ये आपलं स्थान मिळवू शकला नाही. आता तो काही काळ या दुनियेपासून दूर झाला आहे. इमरानने अवंतिका मालिकशी लग्न केलं.

या जोडप्याला एक कन्यारत्न झालं. तिचं नाव आहे इमारा. आता हे दोघे विलग झाले आहेत. पण त्यांची मुलगी आपल्या नावासोबत आई-वडिलांचं नाव लावते. इमारा मलिक खान