हुबेहूब श्रीदेवी सारखी दिसणारी एक कलाकार सोशल म...

हुबेहूब श्रीदेवी सारखी दिसणारी एक कलाकार सोशल मीडियावर वावरते आहे…. बघूया कोण आहे ती…( Meet Sridevi’s Look -Alike Dipali Choudhary, See Pics And Videos )

गेल्या काही दिवसांपासून एका तरुणीने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. ती आहे दीपाली चौधरी, हुबेहूब श्रीदेवी सारखी दिसते. दीपाली एक ब्लॉगर आहे. तसेच ती एक हरियाणवी अभिनेत्री आहे.

दीपाली श्रीदेवीसारखी दिसते. शिवाय ती श्रीदेवीचे फिल्मी संवाद आणि गाणी अगदी तिच्याप्रमाणेच सादर करते. तिचे फोटो आणि व्हिडिओ बघून लोक आश्चर्यचकीत झाले आहेत. अन् श्रीदेवीचं प्रतिरुप इतकं प्रभावी कसं काय असू शकत याची चर्चा करत आहेत.

श्रीदेवी सारखाच अभिनय दीपाली करते. अन् तिच्या प्रमाणेच लूक व हेअर स्टाईल राखते. तिच्या मेकअप श्री प्रमाणे असून डोळे तर तसेच सुंदर आहेत.

तिचे हे प्रतिरुप बघून चाहते खुश झाले आहेत. तिच्या व्हिडिओला बरेच लाइक्स व कमेंटस् मिळत आहेत. इन्स्टावर तर तिचे ९४.३ हजार फॉलोवर्स आहेत. यावरुन तिच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. काही युजर्स तिला अभिनेत्री बन असा सल्ला देत आहेत. अभिनेत्रीच्या अंगी पाहिजे असलेले सगळेच गुण तुझ्या अंगी आहेत, अशीही तिला प्रशस्ती देत आहेत.

तिचे फोटो व व्हिडिओ बघून तुम्हीही थक्क व्हाल.