“जाने बलमा घोडे पे क्यूँ सवार है..” या इंस्टाग्...

“जाने बलमा घोडे पे क्यूँ सवार है..” या इंस्टाग्रामवर सुपरहिट ठरलेल्या गाण्याची गायिका सिरिशा आहे अभ्यासातही हुशार; इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात मिळवलंय सुवर्णपदक (Meet Sireesha Bhagavatula, The Voice Behind Hit Song ‘Ghodey Pe Sawar’, Who was topper in school and who is gold medallist in IT)

सैंय्या घोडे पे क्यू सवार है… हे गाणं इंस्टाग्रामवर एक सध्या प्रचंड धुमाकुळ घालत आहे.

या गाण्यावर प्रचंड रिल्स बनत आहेत.. पण हे गाणं म्हणणारी गायिका कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

हे गाणं म्हणणाऱ्या गायिकेचं नाव सिरिशा भागवतुला असं आहे.

सिरिशाच्या आवाजातल्या या गाण्यावर काही सेलिब्रिटींनीही रिल्स बनवले आहेत

सिरिशाने इंडियन आयडॉल २०२० मध्ये भाग घेतला होता.

सिरिशाने आधी तेलुगु गाणी म्हटली आहेत, त्यानंतर ती इंडियन आयडॉल सिझन १२ मध्ये आली.

“मी लहानपणापासून जुनी गाणी ऐकते, त्यामुळे घोडे पे सवार हे गाणं म्हणताना मला लहानपणीचं ऐकणं कामी आलं. अशा प्रकारचं गाणं म्हणण्यासाठी एक विशिष्ट ढब असते त्यामुळे ते गाणं लोकांपर्यंत पोहचतं. या विशिष्ट स्टाईलमुळेच हे गाणं हिट झालं आणि लोकांना आवडलं,” असंही सिरिशा सांगते.

सिरिशा भागवतुलाला गाण्याची खूप आवड आहे. सिरिशा मुळची विशाखापट्टणमची आहे. तिने काही दिवसांपूर्वी आलेल्या कला या सिनेमासाठीही गाणं म्हटलं आहे.

सिरिशाने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात पदवी मिळवली आहे. एवढेच नव्हे तर तिने या विषयात सुवर्णपदकही मिळवलं आहे.

(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)