भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दसानी आईसारखीच आहे सु...

भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दसानी आईसारखीच आहे सुंदर, तिचे रेखीव फोटो तुम्ही पाहिलेत? (Meet Avantika Dassani, The Beautiful Daughter Of Actress Bhagyashree: See Her Cute Pics)

‘मैंने प्यार किया’ या सिनेमातून सलमान खानसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू केलेली अभिनेत्री भाग्यश्री बराच काळ चित्रपटांपासून दूर आहे. अलिकडेच या अभिनेत्रीने आपला ५२वा वाढदिवस साजरा केला. परंतु आजही तिचं सौंदर्य आणि फिटनेस पाहता ती ३२ वर्षांपूर्वीची भाग्यश्रीच वाटते. भाग्यश्री आपल्या फिटनेसमुळे नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. याव्यतिरिक्त हल्ली ती आपली मुलगी अवंतिकामुळे चर्चेत येऊ लागली आहे. काय करते भाग्यश्रीची मुलगी? ती कशी दिसते? चला तर मग आपण आज अवंतिकाची ओळख करून घेऊया. अवंतिका मोठी झाली असून ती अतिशय रेखीव दिसते आणि सोशल मीडियावरदेखील बरीच प्रसिद्ध आहे.

अवंतिका आता २६ वर्षांची झाली असून आपल्या आईसारखीच सुंदर दिसू लागली आहे. तिच्यामध्ये हिमालय दसानी म्हणजे तिच्या वडिलांची छबी दिसत असली तरी बहुतांशी लोकांना ती वडिलांसारखी नाही तर आई भाग्यश्री सारखीच वाटते.

अवंतिका प्रसिद्धीपासून दूर राहते आणि अजूनतरी तिने बॉलिवूडपासूनही स्वतःला लांबच ठेवले आहे. परंतु सोशल मीडियावर ती सक्रीय आहे आणि नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

अवंतिका सुंदर आणि ग्लॅमरस तर आहेच, शिवाय तिची स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्सही कमालीचा आहे.

लंडनमधील कास बिजनेस स्कूलमध्ये अवंतिका दसानीचे शिक्षण झाले आहे. हे लंडनमधील टॉप कॉलेजपैकी एक आहे. तिने बिझनेस आणि मार्केटिंगमध्ये डिग्री घेतली आहे.

अवंतिकाला प्रवास, नाच, फॅशन, मित्रांसोबत पार्टी करण्याची विशेष आवड आहे. जेव्हा कधी ती आपल्या या हॉबीज एन्जॉय करते, त्या मजेशीर क्षणांचे फोटो ती आपल्या चाहत्यांसोबत न विसरता शेअर करते.

बॉलिवूडमध्ये नसूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून अवंतिकाने अनेक चाहते बनवले आहेत. अवंतिका बॉलिवूडमध्ये कधी येणार असे तिचे चाहते तिला विचारत असतात. परंतु सध्या तरी अवंतिकाने याबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही.

अवंतिकाच्या वडिलांचं हिमालय दसानींचं असं म्हणणं आहे की, अवंतिकाला बिझनेसमध्ये रुची असून ती त्यांचा बिझनेस सांभाळणार आहे.

मागील काही दिवसांत अवंतिका संगीत दिग्दर्शक अनु मलिक यांचा भाचा अरमान मलिक सोबत डेटिंग करत असल्याची चर्चा ऐकू येत होती. परंतु तिने मात्र याबाबत अजून तरी काही सांगितलेले नाही.

अवंतिकाला समाजकार्य करण्याचीही आवड आहे. मुलांना शिकवतानाचे तसेच आपल्या सामाजिक कार्याचे फोटो अनेकदा तिने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. मधे ती म्युन्सिपाल्टी शाळेतील मुलांचा दर शनिवारी आर्ट क्लास घेत होती. मुलांसोबत असा क्वालिटी वेळ घालवताना ती सुखावते.

आपल्या आईप्रमाणे अवंतिकाही स्वतःच्या आरोग्याबाबत दक्ष राहते. आपल्या फिटनेसचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

अवंतिकाला एक हँडसम भाऊदेखील आहे. भाऊ अभिमन्यू दसानी बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याचा विचार करत असल्याचे ऐकिवात आहे.

भाग्यश्रीने १९८९ साली ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून यशस्वी डेब्यू केला. त्यानंतर काही मोजके चित्रपट करुन तिने हिमालय दसानीशी लग्न केले. लग्नानंतर मात्र ती आपला संसार आणि अभिमन्यू व अवंतिकाच्या संगोपनात रमली.

आजही ती बॉलिवूडपासून दूरच आहे. परंतु आपल्या चाहत्यांसोबत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेली आहे. आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची तिलाही आवड आहे.