मीरा राजपुतला स्टार पत्नी म्हटलेले आवडत नाही, म...

मीरा राजपुतला स्टार पत्नी म्हटलेले आवडत नाही, म्हणाली, हा अपमान आहे, स्टार पती का नाही म्हणत(Meera Rajput Don’t Like Anyone Calling Her Star Wife, Said- It’s An Insult, Why Don’t They Call Star Husband)

बॉलिवूडचा प्रसिद्ध सुपरस्टार शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत भलेही चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. तिचे YouTube वर एक चॅनेल आहे, ज्यावर ती दररोज तिचे कटेंन्ट आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. तर इन्स्टाग्रामवरही तिचे भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत. मात्र, तिचे लग्न शाहिद कपूरसोबत झाले असल्याने लोक तिला स्टार वाईफ म्हणून संबोधतात. लोकांनी तिला अशा नावाने हाक मारणे मीराला अजिबात आवडत नाही. एका शोदरम्यान मीराने सांगितले होते की तिला स्टार पत्नी आणि स्टार किड या शब्दांचा तिरस्कार आहे.

सोशल मीडिया ‘स्टार विथ जेनिस’चा पाचवा सीझन सुरू झाला आहे. या शोच्या पहिल्या सीझनमध्ये रॅपर बादशाह आणि शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत पाहुणे म्हणून आले होते. शोमध्ये दोघांनी एकत्र खूप मजा केली आणि आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक रंजक गोष्टींचा खुलासा केला. शोमध्ये बादशाहने सांगितले की त्याच्या घरात मुलांना खूप मजेदार नावे दिली जातात, तर मीरा राजपूतने तिच्या पालकांनी तिचे नाव मीरा का ठेवले ते सांगितले.

 या शोदरम्यान मीरा राजपूतने सांगितले की, मला ‘स्टार वाईफ’ किंवा ‘स्टार किड’ हे शब्दच समजत नाहीत. मला असे शब्द आवडत नाहीत. असे शब्द पूर्णपणे काढून टाकले पाहिजेत.  मीरा म्हणाली, “आपण आता असे शब्द वापरणे बंद केले पाहिजे. कदाचित ही एक असोसिएशन होती जी रिकॉल व्हॅल्यूसाठी बनवणे आवश्यक होते. जेव्हा कोणी लहान मुलाला स्टार किड म्हणून संबोधते तेव्हा त्याचे रूपांतर घराणेशाहीत होते. पण तरीही ते शब्द वापरले जातात. त्याचा मार्ग शोधणे आवश्यक आहे आणि मला स्टार पत्नी का म्हणतात हे कधीच समजले नाही, याचा अर्थ काय आहे?”

मीरा पुढे म्हणाली, “तुमच्याकडे एखादा अभिनेता किंवा सेलिब्रिटी किंवा स्टार असू शकतो ज्यांना पत्नी किंवा पती आहे. तेव्हा कोणीच त्यांना स्टार पती म्हणत नाही मग स्टार पत्नी तरी का म्हणता.

 मीरा राजपूत आणि शाहिद कपूरचे लग्न 2015 मध्ये झाले होते. मीरा शाहिदपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. ते त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत.