औषधी हिंग (Medicinal Properties Of Asafoetida)

औषधी हिंग (Medicinal Properties Of Asafoetida)


कडू व तीक्ष्ण असे हे हिंग पचनसंस्था व हृदय यांच्या आरोग्याकरिता अतिशय उपयुक्त आहे.
कोणत्याही पदार्थाला फोडणी देताना त्यात चिमूटभर हिंग घातला की, पदार्थाची लज्जत वधारते. पदार्थाला छान स्वाद आणि सुगंध प्राप्त होतो. असे हे हिंग आपल्या औषधी गुणांमुळे आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त आहे.
पोटदुखी, पोटात वायू किंवा पोट फुगणे : पोटात गॅसचा त्रास होत असल्यास चिमूटभर हिंग खा. तसेच पोटावर बेंबीच्या भोवताली हिंगाचा पाण्यासोबत तयार केलेला लेप लावल्यास, त्वरित आराम मिळतो.
कान दुखी : 2 चमचे तिळाच्या तेलामध्ये 1 ग्रॅम हिंग, 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडे सैंधव घालून परतवा. हिंग जळल्यावर तेल गाळून बाटलीमध्ये भरून ठेवा. कान दुखत असल्यास किंवा कानात फरफर आवाज येत असल्यास, या तेलाचे 2 थेंब रात्री झोपतेवेळी कानात घाला. असे सलग आठवडाभर केल्यास या तक्रारी दूर होतील.
दात दुखी : हिंग पाण्यात उकळवून, त्या पाण्याने गुळण्या केल्यास दात दुखीत आराम मिळतो. दातांमध्ये खड्डा असल्यास, त्यात हिंग भरून ठेवा. दात दुखीत आराम मिळण्यासोबतच दातांत किडे असल्यास, तेही मरतात.
डोकेदुखी : डोकेदुखीत हिंग गरम करून, त्याचा लेप कपाळावर लावल्यास आराम मिळतो.
मासिक पाळी : मासिक पाळीत पोटदुखीचा त्रास होत असल्यास, पाळी सुरू झालेल्या दिवसापासून तीन दिवस सलग दररोज सकाळी पाण्यामध्ये चिमूटभर हिंग घालून प्या. पोटदुखी थांबते.
पायाच्या भेगा : पायांच्या भेगांना कडुनिंबाच्या तेलात हिंग मिसळून लावल्यास त्वरित आराम मिळतो.
बद्धकोष्ठता : हिंग, सुंठ व मुलहठी समान प्रमाणात बारीक वाटून घ्या. या मिश्रणात मध एकत्र करून चण्याच्या आकाराच्या गोळ्या तयार करा. दुपारी व रात्री दोन्ही वेळा जेवणानंतर एक गोळी तोंडात ठेवून चोखून खा.
काटा रुतल्यास : त्वचेत काटा रुतल्यास चिमूटभर हिंग पाण्यात घोळवून त्या जागी लावा. वेदना
कमी होऊन, काटाही आपोआप बाहेर पडतो.
आकडी : प्रत्येकी 10 ग्रॅम हिंग, सैंधव आणि तूप घेऊन 120 मिलि. ग्रॅम गोमूत्रामध्ये एकत्र करा. नंतर आचेवर ठेवून केवळ तूप शिल्लक राहील, इतके आटवा. हे तूप घेतल्यास आकडीची समस्या
दूर होण्यास मदत होते.
विंचवाचा दंश : विंचूने दंश केल्यास, दंश केलेल्या ठिकाणी हिंग उगाळून लावा.

इतर औषधी गुण
दररोजच्या आहारात हिंगाचा समावेश केल्यास, अन्न पचण्यास मदत होते.
गूळ किंवा बाजरीसोबत हिंग खाल्ल्यास उलटी, ढेकर, उचकी लागणे बंद होते.
हिंग कफ आणि वात यांचा नाश करते.
खाज येत असल्यास, त्या ठिकाणी पाण्यात भिजवून हिंग लावा.
हिंगाच्या गोळीचा वास घेतल्यास, नाकातील सर्दी बाहेर पडण्यास मदत होते.
मूळव्याधीवर हिंगाचा लेप लावल्यास लवकर आराम मिळतो.