अर्जुन कपूरला फसवणारे आरोप लावणाऱ्यांवर बरसली म...

अर्जुन कपूरला फसवणारे आरोप लावणाऱ्यांवर बरसली मलायका अरोरा (‘Mard Hai Wo’- Malaika Arora Slams Trolls Who Say She Has Ruined Arjun Kapoor’s Life)

सध्या मलायका अरोरा आपल्या ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या रिअॅलिटी शोमध्ये स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे करत आहे. यावेळी ती आपल्याहून वयाने लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करण्याबद्दल उघडपणे बोलून ट्रोल करणार्‍यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

मलायका स्वत:पेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. जरी ते बॉलिवूडचे पॉवर कपल मानले जात असले तरी त्यांच्या नात्यामुळे दोघेही अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये, मलायका अर्जुनसोबतच्या आपल्या लव्ह लाईफबद्दल बोलली. तसेच तिने आपण अर्जुनला डेट करून त्याचे आयुष्य उध्वस्त करत नसल्याचे सांगितले.

मलायकाने शोमध्ये तिचा आणि अरबाजचा घटस्फोट, अर्जुनसोबतचे तिचे नाते आणि तिची चालण्याची शैली या गोष्टींवर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. मलायका स्पष्टपणे म्हणाली, “दुर्दैवाने, मी केवळ वयाने मोठीच नाही तर माझ्यापेक्षा लहान व्यक्तीला डेटही करत आहे. तसे करण्याची हिंमत माझ्यात आहे. म्हणजे मी त्याचे आयुष्य उध्वस्त करतेय, असंच सगळे म्हणतात, नाही का? मला सर्वांना सांगायचे आहे की मी त्याचे आयुष्य उध्वस्त करत नाही.  लोकांना हेच सिद्ध करायचे आहे  की तो शाळेत जात होता आणि त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हता आणि मी त्याला सांगितले की, अभ्यास करु नकोस माझ्याकडे ये.”

मलायका पुढे म्हणाली, “याचा अर्थ असा नाही की जेव्हाही आम्ही डेटवर जातो तेव्हा तो क्लास बंक करतो. मी त्याला रस्त्यावर पोकेमॉन खेळताना पकडले. तो मोठा झाला आहे आणि एक पुरुष आहे. आम्ही दोघे प्रौढ आहोत. मला समजत नाही की जर एखादा मोठा मुलगा लहान मुलीला डेट करतो तर त्याला खेळाडू म्हणतात, पण जेव्हा मोठी मुलगी लहान मुलाला डेट करते तेव्हा ते कोणालाच मान्य नसते. हे चुकीचे आहे, नाही का?

मलायका आपल्या शोमध्ये स्टँड अप कॉमेडीमध्ये बोलत होती. अर्जुन कपूर मलायकाच्या स्टँडअप कॉमेडी शोचा भाग बनू शकला नसला तरी व्हिडिओच्या माध्यमातून त्याने त्याच्या लाडक्या मलाइकाची खूप प्रशंसा केली आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

याआधी मलायकाने शोमध्ये बॉयफ्रेंड अर्जुनसोबत आपले नाते आणि लग्नाची योजना उघड केली होती. मलायका अरोराचा शो ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होत आहे. तिचा हा शो लोकांना आवडला आहे.