युरोपियन फिल्म फेस्टिवल मध्ये मराठी दिग्दर्शिके...

युरोपियन फिल्म फेस्टिवल मध्ये मराठी दिग्दर्शिकेचा लघुपट (Marathi Women Director’s Short Film To Be Screened In European Film Festival)

पाश्चात्य युरोपियन संस्कृतीचे दर्शन घडविणारा २६वा युरोपियन युनियन फिल्म फेस्टिवल सुरु झाला आहे. आभासी पद्धतीने सुरु असलेल्या या महोत्सवात ३७ भाषांमधील ६० चित्रपटांचे प्रदर्शन होत आहे.
विशेष म्हणजे या महोत्सवात अर्चना अतुल फडके या मराठी दिग्दर्शिकेने तयार केलेला ‘अबाउट लव्ह’ हा इंग्रजी शीर्षकाचा मराठी लघुपट समाविष्ट करण्यात आला आहे.

या लघुपटात १०२ वर्षे जुनी असलेल्या फडके बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या तीन पिढयांची कथा मांडण्यात आली आहे. थोडीशी हलकीफुलकी व थोडीशी कठोर अशी या चित्रपटाची हाताळणी आहे. प्रत्येक पिढीमधील लहरी प्रेमाचे दर्शन त्यात आहे.

हा चित्रपट जगभरात वाखाणलेला आहे. ब्रिटनमधील शेफील्ड डॉक फेस्टिवल (२०१९) मध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून तर जर्मनीतील इंडियन फिल्म फेस्टिवल मध्ये तेच पारितोषिक ‘अबाउट लव्ह’ ने पटकावले आहे.