रेड कार्पेटवर कलाकारांचा अनोखा अंदाज (Marathi S...

रेड कार्पेटवर कलाकारांचा अनोखा अंदाज (Marathi Stars Glitter On The Red Carpet At The Awards Function)

‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३’ नुकताच जल्लोषात पार पडला. मराठी परंपरा विथ अ ट्विस्ट अशी थीम असल्यामुळे रेड कार्पेटवर कलाकारांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. पारंपरिक पोशाखाला आधुनिकतेची जोड देत कलाकारांनी खऱ्या अर्थाने सोहळ्याची शान वाढवली. एरव्ही आपण या सर्वच कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखांच्या रुपात भेटत असतो. मात्र या सोहळ्याच्या निमित्ताने प्रवाह परिवारातल्या लाडक्या कलाकारांचं हे नवं रुप लक्षवेधी ठरलं. अरुंधती, संजना, अनिरुद्ध, गौरी, जयदीप, शालिनी, पल्लवी, शांतनू, भूमी, आकाश, अप्पू, शशांक, दीपा, कार्तिक, सौंदर्या या सगळ्याच कलाकारांचा हटके अंदाज कौतुकास्पद होता.

स्टार प्रवाह वाहिनीवर रविवारी १९ मार्चला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३ पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असते. यंदा कोणते कलाकार पुरस्कारावर विजेतेपदाची मोहोर उमटवणार आहेत याची उत्सुकता आहे. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण असा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे.