गणेशोत्सवात मालिकेच्या नायिकांचा अनोखा अंदाज (...
गणेशोत्सवात मालिकेच्या नायिकांचा अनोखा अंदाज (Marathi Serial Actresses Shine In Ganeshotsav)

ज्या आराध्य दैवताची आपण वर्षभर वाट पाहत असतो त्या श्री गजाननाचे उद्या आगमन होणार आहे . करोनाचे सावंत असले तरी गणेशभक्तांचा उत्साह तसूभर देखील कमी झालेला नाही. सजावटीच्या रंगबिरंगी साहित्याने आणि पूजाविधीच्या सामग्रीने बाजारपेठा फुलल्या आहेत.


या लाडक्या गणरायाच्या स्वागतात स्टार प्रवाहचे कलाकार सामील झाले आहेत. येत्या रविवारी , दि. १२ सप्टेंबरला प्रक्षेपित होणाऱ्या स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२१ या विशेष कार्यक्रमात त्यांचे सर्व कलाकार चमकणारआहेत. ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पाचं स्वागत करण्यापासून ते आरती, गणेश जन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं काही ते जल्लोषात सादर करणार आहोत. त्यामध्ये मालिकेतील आवडत्या सासू-सुनांच्या जोडया मंगळागौर साजरी करताना दिसतील.





विशेष म्हणजे स्टार प्रवाहच्या मालिकांमधील नायिकांचा अनोखा अंदाज यामध्ये पाहायला मिळेल. ‘आई कुठे काय करते’ मधील संजना मॉडर्न स्वरूपात आपण पाह्त आलो आहोत. ती चक्क नऊवारी साडीत दिसेल तर अरुंधती आणि ‘रंग माझा वेगळा’ची सौंदर्या यांचे साडीमधील सौंदर्य खुलून दिसणार आहे. शिवाय सर्व अभिनेते मंडळी नाचगाण्यात दंग झालेली दिसतील.