मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे...

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन (Marathi Senior Actor Sunil Shende Passed Away)

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे राहत्या घरी निधन झाले आहे. ते 75 वर्षांचे होते. सुनील यांना रात्री चक्कर आली होती. त्यामुळे त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याची माहिती त्यांच्या घरच्यांनी दिली.

रात्री 1 वाजता त्यांनी आपल्या विलेपार्ले येथील घरात अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुलं, सुना आणि नातवंडे आहेत.

अभिनेता सुनील शेंडे यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत विविध भूमिका साकारल्या होत्या. सरफरोश, गांधी, वास्तव या चित्रपटातील भूमिकांमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. 90 च्या दशकात त्यांनी निवडुंग, मधुचंद्राची रात्र, जसा बाप तशी पोर, ईश्वर, नरसिम्हा यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केले होते.