‘चांगली खेळलीस तू,’ २ दिवसात लोकप्र...

‘चांगली खेळलीस तू,’ २ दिवसात लोकप्रिय झालेले मराठी रॅप साँग (Marathi Rap Song Gains Popularity In Just 2 Days)

प्रेम रंगतं  तेव्हा मजा येते पण ब्रेकअप होतो तेव्हा सजा वाटते…. ब्रेकअप झालेल्या व्यक्तीला काय वाटत असेल, त्या भावना व्यक्त करताना तो बोलतो, ‘ चांगली खेळलीस तू …. भावनांशी माझ्या चांगली खेळलीस तू….’
हे ब्रेकअप रॅप साँग नुकतेच पुण्यात प्रदर्शित करण्यात आले. रॅपर सर्जा यानेच हे गाणे लिहिले आहे व गायले आहे. विनय प्रतापराव देशमुख, रुचिरा जाधव आणि सायली संजीव यांनी त्यावर अभिनय केला आहे.

विशेष म्हणजे या मराठी रॅप साँगला फक्त २ दिवसात ३ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पसंत केले आहे. रिफील मराठी, या यू टयूब  चॅनलवर ते प्रदर्शित झाले आहे.

विनय प्रतापराव देशमुखने या रॅप साँगचे दिग्दर्शन केले आहे. प्रेम आणि ब्रेकअप या बरोबरच ‘आई’चं महत्व यात विशाद करण्यात आलं आहे. ब्रेकअप झाल्यावर आईच्या कुशीत जाऊन मनमोकळं रडावंसं  वाटतं, ही भावना दर्शवून गाण्याला भावनिक जोड देण्यात आली आहे.
रॅपर सर्जाने गायलेल्या या गाण्यास शांप्रद भम्रे यांनी संगीत दिलं आहे.