‘टाइमपास ३’ ची ४ दिवसात ४ कोटी ३६ ल...

‘टाइमपास ३’ ची ४ दिवसात ४ कोटी ३६ लाख रुपये कमाई (Marathi Film Teenagers Love Story ‘Timepass3’ Has Record Break Box Office Collection Of Rs. 4.36 Crores In Just 4 Days )

बरेच दिवस चर्चेत असलेला टाइमपास 3 हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासूनच चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु होती. टाइमपास चित्रपटात केतकी माटेगावंकर आणि प्रथमेश परब ही जोडी पाहायला मिळाली होती तर टाइमपास २ मध्ये प्रियदर्शन जाधव आणि अभिनेत्री प्रिया बापटने प्रमुख भुमिका साकारली होती. या वेळी टाइमपास ३ मध्ये मात्र अभिनेत्री ह्रता दुर्गुळे आणि प्रथमेश परब ही नवीकोरी जोडी पाहायला मिळाली.

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला भरघोस यश मिळत आहे. आता पर्यंत या चित्रपटाने ४ कोटी ३६ लाखांचा गल्ला जमवला आहे.

या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ८० लाखांची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी १ कोटी ९० लाख कमावले होते. तर चौथ्या दिवशी या चित्रपटाने तब्बल ४ कोटींचा आकडा पार केल्यामुळे चित्रपटाच्या टीमने तसे नवे पोस्टरही प्रदर्शित केले आहे.

या चित्रपटात ह्रता आणि प्रथमेशसोबतच वैभव मांगले, संजय नार्वेकर, मनमीत पेम, अन्विता फल्टणकर, भाऊ कदम हे कलाकार आहेत.