अमृता सुभाषने शेअर केलेल्या गर्भारपणाचे चित्र आ...

अमृता सुभाषने शेअर केलेल्या गर्भारपणाचे चित्र आणि त्या मागचे गुपित ( Marathi Film Star Amruta Subhash Is Really Pregnant ? Check The Truth Behind Her Pregnancy Kit Photo)

मराठी सिनेसृष्टीत उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अमृता सुभाषने मराठीसोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीसुद्धा गाजवली आहे. पण सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अमृताने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पोस्टमध्ये अमृताने एका प्रेग्नन्सी किटचा फोटो शेअर केला असून घरी एक पाहुणा येणार असल्याचे संकेत दिले . पण नंतर तो एका चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असल्याचे समोर आले.

खरेतर अमृताचे 2003 मध्ये अभिनेता संदेश कुलकर्णीसोबत लग्न झाले होते. त्यामुळे लग्नाच्या 19 वर्षांनी तिने गोड बातमी दिल्याचा चाहत्यांचा समज झाला होता. आणि चाहते सुद्धा खूप खुश होते. पण अमृताने दुसरी पोस्ट शेअर करताच त्यांच्या आनंदावर विरजण पडले.

अमृताने शेअर केलेल्या पहिल्या पोस्टमध्ये पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी किट दिसत आहे. पण ते किट अमृताच्या गर्भारपणाचा नसून तिच्या वंडर वुमन या प्रोजेक्टच्या प्रमोशनचा भाग असल्याचे नंतर तिने स्पष्ट केले.

वंडर वुमनमध्ये अमृता जया हे पात्र साकारत असून जया गरोदर असल्याचे अमृताने तिच्या पुढील पोस्टमध्ये व्हिडिओ शेअर करत सांगितले. तुम्ही सर्वांनी माझ्यावर जसा शुभेच्छांचा वर्षाव केलात तसाच जयावरही करा असं अमृता म्हणाली.

अमृताच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास तिचे ती फुलराणी हे नाटक खूप गाजले. 2004 मध्ये तिने श्वास या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. तिने गली बॉयसारख्या काही हिंदी चित्रपटातही काम केले.