सामाजिक विषयावरील उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ...

सामाजिक विषयावरील उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळविणारा ‘फनरल’ हा मराठी चित्रपट : फनरल म्हणजे काय? प्रेक्षकांना पडलेला प्रश्न (Marathi Film ‘Funral’ Bags National Award For Best Film On Social Content)

‘फनरल’ हे विचित्र नाव असलेल्या मराठी चित्रपटास, सामाजिक विषयावरील उत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. याच्या इंग्रजी स्पेलिंगनुसार त्याचा उच्चार ‘फ्युनरल’ (अर्थात अंत्यसंस्कार) असा होतो. पण एक गंभीर सामाजिक विषय रंजक पद्धतीने मांडल्याने त्याचे शीर्षक ‘फनरल’ असे घ्यावे, असा अट्टहास दिग्दर्शक विवेक राजेंद्र दुबे यांनी धरला व हा चित्रपट या नावाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील गाजला.

या चित्रपटात अंत्यविधी, अंत्यसंस्कार करण्याचा व्यवसाय करणाऱ्या बेरोजगार पण सुशिक्षित युवकाची कथा मांडण्यात आली आहे. असे सामाजिक कार्य करणारी कंपनी आपण सुरु केली तर आपल्याला रोजगार मिळेल व समाजसेवा केल्याचे समाधान मिळेल, हा त्यांचा उद्देश असतो. आरंभी या कल्पनेस विरोध करणारे लोक अखेरीस अशा सेवासंस्थेची गरज मान्य करतात.

या चित्रपटाचे प्रमुख कलावंत आरोह वेलणकर, प्रेमा साखरदांडे, विजय केंकरे आहेत. निर्माते रमेश दिघे आहेत.