ज्येष्ठ अभिनेते अविनाश मसुरकर यांचे निधन (Marat...

ज्येष्ठ अभिनेते अविनाश मसुरकर यांचे निधन (Marathi Cine-Stage Artist Avinash Masurkar Passes Away)

Artist Avinash Masurkar

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा तिन्ही माध्यमातून अभिनेता म्हणून आपली छाप पाडलेले ज्येष्ठ अभिनेते अविनाश मसुरकर (Artist Avinash Masurkar) यांचे, त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.

Artist Avinash Masurkar

केवळ कलेवर जगणारे अभिनेते म्हणून मसुरकरांची ख्याती होती. फुलाला सुगंध मातीचा, तरुण तुर्क म्हातारे अर्क, हॅण्डस्‌ अप, प्रीतीगंध, लपंडाव, शततारका अशा असंख्य व्यावसायिक नाटकांमधून त्यांनी भूमिका गाजवल्या. भक्ती बर्वे, सतीश दुभाषी, सदाशिव अमरापूरकर, अशा मान्यवर कलावंतांसोबत त्यांनी समर्थपणे भूमिका निभावल्या. सुखवस्तू कुटुंबात ते वाढले असल्याने केवळ कलाकार म्हणूनच जगले. स्वतःची ॲम्बेसेडर कार घेऊन नाटकाला येणारा हा पहिला श्रीमंत कलावंत होता.

Artist Avinash Masurkar

कलावंतीण, सुशीला, सूनबाई ओटी भरून जा, जन्मकुंडली, ते ८ दिवस अशा मराठी चित्रपटातून मसुरकर नायकाच्या भूमिकेत चमकले. घरकूल या मराठी मालिकेतही त्यांनी आपली चमक दाखवली. ‘संसार’ व अन्य काही चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले होते.