मराठमोळी अभिनेत्री तेजश्री जाधवचा हिंदी वेब सिर...

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री जाधवचा हिंदी वेब सिरीजमध्ये थरारक अभिनय (Marathi Actress Tejashree Jadhav’s Thriller Performance In The Hindi Web Series ‘The Joker: A Strange Kidnapper’ )

दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी मराठी मुलगी तेजश्री जाधव सध्या एमएक्स प्लेअर वरील ‘द जोकर: अ स्ट्रेंज किडनॅपर’ या हिंदी सिरीजमधून झळकत आहे. ‘अट्टी’ या तामिळ फिल्मनंतर ती ‘अकीरा’, ‘माधुरी टॉकीज’ ह्या हिंदी सीरिजमध्ये देखील दिसून आली होती. या शिवाय तेजश्रीने माझी सहेली मासिकाच्या मुखपृष्ठासाठी फोटोशूटही केलेलं आहे.

तेजश्रीने माटुंग्याच्या रूईया कॉलेजमधून प्रयोगिक नाटकाचे धडे गिरवले असून, मराठी रंगमंचानेच माझ्यात अभिनयाचे पैलू पाडले असल्याचं ती सांगते. नेहमी ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमध्ये दिसणारी तेजश्री जोकर मध्ये वेगळ्या व्यक्तीरेखेत दिसून येणार आहे. यात ती हिंदी कलाकार हितेन तेजवानी सोबत झळकणार आहे.

‘द जोकर: अ स्ट्रेंज किडनेपर’ हा एक थ्रिलर पट असून यात मंगेश देसाई यांची देखील विशेष भूमिका आहे. या वेब सिरीजचे एकूण ८ भाग असून सध्या ही अतिशय ट्रेंडिंग आहे.