मानसी नाईक- प्रदिप खरेरा घटस्फोटाच्या मार्गावर(...

मानसी नाईक- प्रदिप खरेरा घटस्फोटाच्या मार्गावर(Marathi Actress Mansi Naik Likely To Take Divorce)

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक गेले काही दिवस तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे खूप चर्चेत आहे. मानसी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मात्र गेले काही दिवस ती सोशल मीडियावर भावनिक आणि धार्मिक पोस्ट सतत शेअर करत आहे.

याशिवाय तिने आपल्या अकाउंटवरुन आपला पती प्रदिप खरेरासोबतचे फोटोही काढून टाकले आहेत. त्यामुळे तिच्या आयुष्यात भयंकर उलथापालथ झाल्याचे जाणवते. अशातच तिच्या घटस्फोटांच्या चर्चांना देखील उधाण आले आहे. या चर्चांवर आता तिने खुलासा देखील केला आहे.

एका मुलाखतीत मानसीने आपण घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे कबुल केले. त्यामुळे मानसी आणि तिचा पती प्रदिप खरेरा वेगळे होणार असल्याचे निश्चित झाले आहे. मानसी आणि प्रदिप वेगळे होणार असल्याचे समोर आल्यावर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कमेंटमधून ते या दोघांना वेगळे न होण्याची विनंती करत आहेत.

गेल्या वर्षीच मानसी आणि प्रदिपचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले होते. त्याआधी त्यांनी खूप वर्षे एकमेकांना डेट केले. मात्र लग्नानंतर दिड वर्षांनीच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.