अभिनेत्री क्रांती रेडकर आणि तिचे पती समीर वानखे...

अभिनेत्री क्रांती रेडकर आणि तिचे पती समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी (Marathi Actress Kranti Redkar And Her Husband Sameer Wankhede Gets Death Threat )

मराठी सिनेअभिनेत्री क्रांती रेडकर आणि तिचे पती एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात त्यांनी एफआयआर दाखल करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून वानखेडे चर्चेत होते. ड्रग्ज ऑन क्रुझ प्रकरणाच्या तपास वानखेडे करत होते. या प्रकरणात बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्लीन चिट मिळाल्यानंतर वानखेडेंची चेन्नईला बदली करण्यात आली होती.2 ऑक्टोबर 2021 रोजी कॉर्डेलिया क्रूझवर NCB टीमने छापा टाकला होता. वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत आर्यनसह 20 जणांना अटक करण्यात आली. या समीर वानखेडे यांना 16 ऑगस्टला’AmanA1A1′ या ट्विटर हँडलवरून मेसेज आला होता.

ट्विटरवर दिलेल्या या धमकीमध्ये लिहिले होते की, ‘तुम्ही काय केले ते तुम्हाला माहीत आहे. त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. आम्ही तुम्हाला संपवू.’ विशेष म्हणजे हे ट्विटर अकाउंट १६ ऑगस्ट रोजीच तयार करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या अकाउंटला एकही फॉलोवर्स नाही.त्यामुळे वानखेडे यांना धमकावण्याच्या उद्देशाने हे अकाऊंट तयार करण्यात आल्याचे समजते. यामध्ये समीरची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरला सु्द्धा धमकी दिली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांकडे तक्रार केल्याचे समीरने प्रसारमाध्यमांना सांगितले.

सुरुवातीला समीर यांनी या धमक्यांकडे दुर्लक्ष केले. पण धमक्या सतत येतच राहिल्याने १७ ऑगस्टला त्यांनी धमकी देणाऱ्याला त्या धमकी मागचे कारण विचारले. पण त्यानंतर त्या व्यक्तीने आपले अकाउंटच डिलीट केले.