शर्टाची बटणे उघडी ठेवून फोटोशूट करणे या मराठी अ...

शर्टाची बटणे उघडी ठेवून फोटोशूट करणे या मराठी अभिनेत्रीला पडले महागात, युजर्सनी सुनावले खडेबोल (Marathi Actress Gets Troll For Her Bold Photoshoot)

सोशल मीडिया हे एक असे साधन आहे जिथे एखादी गोष्ट पोस्ट केली आणि जर ती व्हायरल झाली तर ती पोस्ट करणाऱ्याला चांगलीच प्रसिद्धी मिळते. अनेक सेलिब्रेटी आपापल्या चाहत्यांसोबत जोडलेले राहण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. तिथे आपले वेगवेगळे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. चाहते देखील त्यांच्या पोस्टला खूप चांगला प्रतिसाद देत असतात.

सोशल मीडियावर अनेक अभिनेत्री आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असतात. यामध्ये हिंदी अभिनेत्रींचे प्रमाण थोडे जास्त असते. पण जर मराठी अभिनेत्रीने चुकुन एखादा बोल्ड फोटो शेअर केलाच तर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते. असेच काहीसे अभिनेत्री अक्षया गुरवसोबत घडले आहे. मानसीचा चित्रकार तो, लव्ह लग्न लोचा यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम करुन अक्षयाने खूप प्रसिद्धी मिळवली. सध्या ती मालिकांमध्ये फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय आहे.

अक्षयाने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं आहे. फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचे शर्ट घातलं आहे. मेसी बन आणि साजेसा मेकअप करत अक्षयाने ग्लॅमरस लूक केल्याचे पाहायला मिळते. या फोटोत अक्षयाने आपल्या शर्टाची बटणे उघडी ठेवली आहेत. त्यात ती खूप छान दिसत असली तरी तिच्या चाहत्यांना मात्र तो फोटो फारसा आवडलेला नाही.

अक्षयाने केलेल्या या बोल्ड फोटोशूटमुळे चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एकाने कमेंट करत “तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. जेव्हा कलाकरांना काम मिळत नाही, तेव्हा ते शरीर प्रदर्शन करुन चर्चेत येण्याचा व काम मिळवण्याचा प्रयत्न करतात”, असं म्हटलं आहे.

तर दुसऱ्याने “अक्षया शरीर प्रदर्शन ही फॅशन नसून विकृती आहे. जी समाजाला अधोगतीकडे घेऊन जात आहे. त्यात आज तूही योगदान दिलं आहेस”, अशी कमेंट केली आहे.