कबड्डीचा सामना जिंकण्यासाठी...

कबड्डीचा सामना जिंकण्यासाठी मंदार जाधव झाडाला लटकला… हा काय प्रकार? (Marathi Actor Dangled On Tree To Win Kabaddi Match?… Know What’s The Matter)

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. या मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर असून लवकरच मालिकेत कबड्डीचा सामना रंगणार असल्याचे दाखविण्यात येणार आहे. शालिनीने शिर्केपाटील कुटुंबाला त्यांची बळकावलेली प्रॉपर्टी परत मिळवण्याकरिता तिच्यासोबतचा कबड्डीचा सामना त्यांना जिंकावा लागेल अशी अट घातली आहे. त्यामुळे आता जयदीप-गौरीसह संपूर्ण कुटुंबाने कंबर कसली आहे. कबड्डीचा सामना जिंकायचा तर चांगला प्रशिक्षक हवा. याच प्रशिक्षकाचा शोध घेण्यासाठी जयदीप जंगलामध्ये गेला असताना भलत्याच संकटात सापडला. झाडाला लावलेल्या फासात त्याचा पाय अडकला आणि तो उलटा टांगला गेला.

अवघ्या काही मिनिटांच्या या सीनसाठी जयदीपची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवला बरीच मेहनत घ्यावी लागली होती. चार ते पाच तास या भागाचं शूटिंग सुरु होतं. हा सीन शूट करणं अवघड तर होतंच आणि तितकंच जबाबदारीचं देखील होतं. फाईट मास्टर, दिग्दर्शकांच्या सूचना आणि सेटवरील सर्व मंडळींच्या सहकार्याने मंदारने हा अवघड सीन पूर्ण केला. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हे आव्हान स्वीकारल्याचं त्यानं सांगितलं. हा प्रसंग कायम लक्षात राहिल असंही तो म्हणाला.

सुख म्हणजे काय असतं मालिकेतला कबड्डीचा सामना लवकरच होईल, परंतु कोण जिंकणार याची दर्शकांना नक्कीच उत्सुकता आहे.