अभिनेते अरविंद धनू यांचे निधन (Marathi Actor Ar...

अभिनेते अरविंद धनू यांचे निधन (Marathi Actor Arvind Dhanu Passed Away Due To Brain Stroke)

सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी यावर्षी जगाचा निरोप घेतला आहे. लता मंगेशकर, केके, बप्पी लहरी , रमेश देव यांच्या पाठोपाठ आता आणखी एका कलाकराचे निधन झाले आहे. मराठी कलाकार अरविंद धनू यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक निघून जाण्याने मराठी सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून अरविंद यांना प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेत त्यांनी शालिनीच्या वडिलांचे पात्र साकारले होते.

अरविंद सोमवारी २५ जुलैला एका कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा अचानक त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास व्हायला लागला. त्यांना तातडीने रुग्णलयात नेण्यात आले. समोर आलेल्या अहवालात त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याचे बोलले जाते. रुग्णालयात नेल्यावर काही वेळातच त्यांचे निधन झाले.

अरविंद यांचे सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतील शालिनीच्या वडिलांचे खलनायकाचे पात्र गाजले. या व्यतिरिक्त त्यांनी लेक माझी लाडकी, क्राइम पेट्रोल या  मालिकांमध्येही काम केले आहे. एक होत्या वाल्या या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले होते.

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे. अरविंद यांच्यावर मुंबईतील माहिम येथील स्मशानभूमीत त्यांचे कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारही उपस्थित होते.