मानुषी छिल्लरला करायचे आहे या दिग्दर्शकासोबत का...

मानुषी छिल्लरला करायचे आहे या दिग्दर्शकासोबत काम (Manushi Chillar Wants To Work In This Director’s Film)

माजी ब्युटी क्वीन मानुषी छिल्लर चित्रपटांमध्ये पूर्णपणे सक्रिय झाली आहे. 2022 मध्ये तिने अक्षय कुमारसोबत ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान तिने आपल्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल सांगितले. या संवादादरम्यान तिने आपल्या आवडत्या दिग्दर्शकाचे नावही सांगितले आहे. तसेच त्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची इच्छासुद्धा तिने व्यक्त केली.  

एका सुप्रसिद्ध वेब पोर्टलशी बोलताना मानुषी छिल्लरला विचारण्यात आले की, इंडस्ट्रीतील तुझा आवडता दिग्दर्शक कोण ज्यासोबत काम करण्याची तुझी खूप इच्छा आहे?

या प्रश्नाचे उत्तर देताना मानुषी म्हणाली, “नक्कीच, आपल्या सर्वांकडे अशा लोकांची यादी असते ज्यांच्यासोबत आपल्याला काम करायचे आहे. माझ्याकडे अभिनेत्यांची यादी आहे असे मला वाटत नाही. मी जेव्हा जेव्हा एखादा चित्रपट पाहते आणि मला तो आवडतो तेव्हा मी त्या चित्रपटाचा दिग्दर्शक पाहते आणि त्याचे नाव माझ्या दिग्दर्शकांच्या यादीत जोडते. मला वाटते की मला एक दिग्दर्शक आवडतो, पण त्याचे नाव मी आता सांगणार नाही, परंतु मला त्याच्यासोबत काम करायचे आहे. मी त्याबद्दल खूप उत्सुक आहे आणि लवकरच मी माझी ती इच्छा पूर्ण करणार आहे. पण शेवटी मानुषीने आपल्या आवडत्या दिग्दर्शकाचे नाव उघड केले आणि तिला RRR चे दिग्दर्शक राजामौली यांच्या चित्रपटात काम करायचे असल्याचे सांगितले.

नुकतेच मानुषीने आपल्या आगामी ‘तेहरान’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत जॉन अब्राहम दिसणार आहे. जॉन आणि मानुषीचा हा चित्रपट एक जियो पॉलिटिकल ड्रामा असल्याचं बोललं जात आहे, हा चित्रपट खऱ्या कथेवर आधारित असणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग इराणमध्ये झाले आहे.

मानुषी छिल्लरने ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार होता. अक्षयने या चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली होती, तर मानुषीने संयोगिताची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नसला तरी मानुषीच्या अभिनयाला लोकांनी नक्कीच दाद दिली.