मनोज बाजपेयी होते एक ट्रेंड डान्सर, पण ऋतिक रोश...

मनोज बाजपेयी होते एक ट्रेंड डान्सर, पण ऋतिक रोशनचा डान्स बघून सोडले त्यावर पाणी(Manoj Bajpayee Says He Was Trained Dancer, But Quit After He Saw Hrithik Roshan- ‘Aaj Ke Baad Dancing Ka Khwaab Band…’)

मनोज बाजपेयी हे बॉलिवूडमधील हुशार अभिनेत्यांपैकी एक आहेत. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या थिएटरच्या दिवसांची आठवण काढत म्हटले की, जेव्हा मी माझ्या करीअरची सुरुवात केली तेव्हा मीसुद्धा उत्तम नाचायचो, परंतु हृतिक रोशनचा डान्स पाहिल्यानंतर नी डान्सचे स्वप्न पाहणेसुद्धा बंद केले.

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना अभिनेता मनोज बाजपेयी म्हणाला की, तो एक ट्रेंड डान्सर होता, पण हृतिक रोशनला पाहून त्याने डान्सर होण्याचे स्वप्न बघायचे सोडून दिले.

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा मनोज बाजपेयी यांचा सत्या चित्रपट 1998 मध्ये आला होता, तर हृतिकने 2000 साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. रंगभूमीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना मनोज बाजपेयी यांनी खुलासा केला – मी रंगभूमीशी जोडलेला आहे. त्यामुळे गाणे कसे गायचे हे कलाकाराला कळले पाहिजे, अशी तेव्हाची अट होती. जरी तुम्ही आघाडीचे गायक बनला नाहीत तरी चालेल. पण तुम्ही किमान कोरस गायक असले पाहिजे. अजून एक गोष्ट, मी पण नाचायचो.

मनोजने हेही सांगितले – मी डान्स शिकलो आहे. मी नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. पण जेव्हा हृतिक आला आणि हृतिकचा डान्स पाहिला तेव्हा मी म्हणालो की आजच्या नंतर डान्सचे स्वप्न पाहणे बंद. कारण आता याहून जास्त मी ते शिकू शकत नाही.

‘सत्या’ चित्रपटातील ‘सपनो में मिलती है…’ या लोकप्रिय गाण्यातील त्याच्या डान्स परफॉर्मन्सबद्दल बोलताना मनोज म्हणाला की, हृतिक येण्यापूर्वी त्याला जे काही डान्स करायचे होते ते त्याने आधीच केले होते. हृतिकला पाहून डान्स थांबवला.