मनोज बाजपेयी यांनी हिंदी भाषेला पाठिंबा देण्यास...

मनोज बाजपेयी यांनी हिंदी भाषेला पाठिंबा देण्यासाठी सांगितली मोठी गोष्ट, म्हणाले ‘माझ्याकडे कोणतीही स्क्रिप्ट इंग्रजी भाषेत आली तर मी ती परत करतो’ (Manoj Bajpayee opens about the importance of Hindi Language, Says- I want my script in Hindi only, If it is written in English, I return back to them)

मनोज बाजपेयी हे अशा मोजक्या अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी स्वतःच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आज सिनेविश्वात प्रेक्षक त्यांच्या नावाने चित्रपटगृहात जातात. हिंदी भाषेवर प्रेम करणाऱ्या आणि हिंदी भाषक असल्याचा अभिमान असलेल्या मनोज बाजपेयी यांनी अलीकडेच एका कार्यक्रमा दरम्यान हिंदी भाषेचे समर्थन केले आणि ते स्वतः हिंदीला प्रोत्साहन देण्यासाठी काय करतात ते त्यांनी सांगितले.

मनोज बाजपेयी नुकतेच दिल्लीत एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला पोहोचले होते, जिथे त्यांनी हिंदी भाषेकडे केवळ इंडस्ट्रीतच नव्हे तर आपल्या समाजातही दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले.

हिंदीकडे दुर्लक्ष होण्यास केवळ मनोरंजन उद्योगच नाही तर आपला समाजही तितकाच जबाबदार असल्याचे मनोज बाजपेयी म्हणाले. “आजकाल प्रत्येकाला आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवायला आवडते, मग मुले अभ्यासात चांगली, वाईट कशीही असोत. मुलाने आधी इंग्रजी शिकावे आणि नंतर वेळ आणि शक्ती शिल्लक राहिल्यास इतर भाषा शिकाव्यात असे त्यांना वाटते. कदाचित यामुळेच आपण पालक म्हणून अपयशी ठरत आहोत. केवळ पालक म्हणून नव्हे तर शिक्षक म्हणूनही आपण हिंदी भाषेचे संवर्धन करण्यात अपयशी ठरत आहोत.”

मनोज बाजपेयी यांनी पुढे बॉलीवूडमध्ये हिंदीकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल सांगितले. ते म्हणाले, “बॉलिवुडमध्ये येणाऱ्या ९०-९५% लोकांना फक्त इंग्रजीत लिहता-वाचता येते, हे खूप दुर्दैवी आहे. हिंदीत त्यांच्या स्क्रिप्ट वाचणारे कलाकार कदाचित फार कमी असतील. हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी माझे योगदान हे आहे की मी माझ्या चित्रपटांच्या स्क्रिप्ट फक्त देवनागरीतच वाचतो. जेव्हा जेव्हा माझ्याकडे इंग्रजी भाषेत स्क्रिप्ट येते तेव्हा मी ती परत करतो आणि हिंदीत पाठवायला सांगतो.”

मनोज बाजपेयी पुढे म्हणाले की, “मला इंग्रजी येत नाही असे नाही, पण जेव्हा मला ऑनस्क्रीन हिंदीत बोलायचे आहे, तर मग हिंदीतच स्क्रिप्ट का वाचत नाही. जर आपल्याला याच भाषेत व्यक्त व्हायचं असेल, तर लिहिता-बोलता, वाचतानाही हिंदी भाषा आपल्या मनात असली पाहिजे, तरच आपण गोष्टी चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकू.”