मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला बॉलिवूड सेलि...

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला बॉलिवूड सेलिब्रेटींची हजेरी (Manish Malhotra Diwali Party: B-Town Celebrities Attend The Star-Studded Bash in SIZLLING Ethnic Outfits, See Pics)

बॉलिवूडमध्ये सध्या दिवाळी पार्ट्यांचे वारे वाहत आहे. सर्वात आधी आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यपच्या घरी दिवाळीची पार्टी झाली. त्यानंतर क्रिती सेननच्या घरी सुद्धा पार्टी झाली. काल मनिष मल्होत्राच्या घरीसुद्धा पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली.

करण जोहर, अभिषेक बच्चन, काजोल ते सुहाना खान, शनाया कपूर, अनन्या पांडे हे सर्वजण फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय डिझायनर मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सहभागी झाले होते.

अनन्या पांडेने काळा आणि चंदेरी रंगाचा पोशाख घातला होता तर आदित्य रॉय कपूरने काळ्या रंगाचा पोशाख घातला होता.

शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टीने पापाराझींसमोर आपल्या सेक्सी फिगरचे प्रदर्शन करत पोज दिल्या. तर जान्हवी कपूर आणि खुशी कपूरनेसुद्धा जोडीने हजेरी लावली होती.

बॉलिवूड ब्युटी डायना पेंटी आणि अथिया शेट्टीने देखील मनीष मल्होत्राच्या पार्टीत आपल्या आकर्षक लूकने सर्वांना थक्क केले.

जेनेलिया-रितेश आणि कतरिना-विकी या जोडीने चाहत्यांची मने जिंकली.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत एकत्र पोहोचले होते.

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत महीप कपूर- सीमा सजदेह-अमृता अरोरा आणि शिबानी दांडेकरही अतिशय सुंदर दिसत होत्या.

कार्तिक आर्यन आणि करण जोहर पारंपरिक पोशाखांमध्ये दिसले.

या पार्टीत बी-टाऊनचे हॉट कपल जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंह देखील दिसले. पार्टीमध्ये करिश्मा कपूर आणि कतरिना कैफ बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटताना दिसल्या.

नोरा फतेही आणि रिया चक्रवर्ती पार्टीत खूपच हॉट दिसत होत्या.

शाहरुखची लेक सुहाना आणि सैफची लेक सारासुद्धा पार्टीत खूप सुंदर दिसत होत्या.