मित्रासोबत बिकिनी घालून पूलमध्ये उतरली मंदिरा ब...

मित्रासोबत बिकिनी घालून पूलमध्ये उतरली मंदिरा बेदी, नाराज नेटकऱ्यांनी विचारले – हा तुमचा नवा नवरा आहे का? (Mandira Bedi drops pool picture with male friend, gets brutally trolled, netizens ask- kya ye aapka naya pati hai)

अभिनेत्री मंदिरा बेदीचा नवरा दिग्दर्शक राज कौशल याचं गेल्याच वर्षी हृद्यविकाराच्या तीव्र झटक्यानं अचानक निधन झालं होतं. मंदीरा बेदी त्यावेळी जितकी खंबीर दिसली होती, तितकीच ती मनातनं कोसळलीही होती. अनेकदा आपले बोल्ड फोटो शेअर करणारी मंदिरा त्यावेळी सोशल मीडियावरनं जणू गायब झाली होती. आता जवळ-जवळ वर्षभरानंतर मंदिरानं बिकिनी घालून फोटो शेअर केले आहेत.

अलीकडेच मंदिराने आपल्या एका मित्रासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. मंदिरा सध्या थायलंडमधील फुकेत आयलंडवर आपल्या या खास मित्राचा बर्थ डे सेलिब्रेट करीत आहे. तिनं आपला मित्र आदित्य मोटवानी सोबतचा पूल साईडला काढलेला सेल्फी शेअर करीत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मित्राला घट्ट मिठी मारत काढलेला तो फोटो शेअर करीत मंदिरानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ”हॅप्पी बर्थडे आदि. हा फोटो खूप काही बोलून जातोय, तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस, आपण दोघे एकमेकांना किती वर्षांपासून ओळखत आहोत, आपल्यात किती छान बॉन्डिंग आहे आणि मी तुझ्यावर किती विश्वास ठेवते या सर्व गोष्टींविषयी. पुढील आयुष्यात तुला खूप प्रेम, आनंद आणि यश मिळो. लव्ह यू, वयाच्या १७ व्या वर्षापासून माझ्यासोबत असलेल्या माझ्या खास मित्रा.”

मंदिरा बेदीनं हे फोटो शेअर केल्यानंतर काळीच वेळात नेटकऱ्यांनी तिला यावरुन ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे, ‘मजा आहे तुमची’. तर दुसऱ्यानं लिहिलं आहे, ‘हा कोण आहे, नवरा तर राहिला नाही तुझा, निधन झालं त्याचं.’ नेटकऱ्यांच्या अशा प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मंदिरानं कमेंट सेक्शनच बंद करून टाकलं. पण तिच्या या फोटोंना तिच्या इतर अनेक चाहत्यांनी मात्र पसंत केलं आहे.

या व्यतिरिक्त मंदिराने आपल्या इन्स्टाग्रामवर सर्व मित्रमंडळींचे पूलमध्ये एन्जॉय करतानाचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. या फोटोनांही कॅप्शन देताना तिने म्हटलंय – ही जागा, जी मला सुखाचा अनुभव देते… पाणी, ओशन,पूल.