सामना वीर म्हणून गाजलेला आयपीएल खेळाडू पिछाडीस ...

सामना वीर म्हणून गाजलेला आयपीएल खेळाडू पिछाडीस राहिला… कारण काय? (Man Of The Match Prize Winner Batsman Rinku Singh Had A Hard Luck… Know The Reason)

यंदाच्या आयपीएल क्रिकेट हंगामात कोलकाता नाईट रायडर्स या संघातून खेळणारा फलंदाज रिंकू सिंह कमनशिबी ठरला अन्‌ पिछाडीस राहिला…

रिंकूने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात नाबाद ४२ धावा काढून मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक मिळविले. त्याबद्दल त्याला दुचाकी देखील भेट मिळाली. अलिगड मधून आयपीएल संघात पदार्पण केलेला रिंकू हा पहिलाच क्रिकेटपटू आहे. तो कोलकाता संघाकडून ७ सामने खेळला. अन्‌ १४८.७१ या स्ट्राईक रेटने त्याने एकूण १७४ धावा काढल्या आहेत.

रिंकू गरीब घरातून पुढे आला. त्याचे वडील खानचंद सिंह हे गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करतात. रिंकूने क्रिकेट खेळण्यास त्यांचा सुरुवातीला विरोध होता. पण रणजी सामन्यातून त्याने थेट आयपीएल सामन्यात मजल मारली. अन्‌ तिथून दुचाकी जिंकल्यावर त्यांचे मन पालटले. रिंकूने जिंकलेली बाईक आता ते गॅस सिलेंडर डिलिव्हरीसाठी वापरतात.

पहिल्या आयपीएल मॅचमध्ये रिंकूने २८ चेंडूत ३५ धावा काढून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते खरे, पण विजय हजारे ट्रॉफी सामन्यांत त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यावर शस्त्रक्रिया  करण्यात आली. अन्‌ रिंकू खेळण्यास अपात्र ठरला. आता तो अलिगड क्रिकेट स्कूलमध्ये प्रशिक्षक आहे.

क्रिकेट हा अनिश्चिततेचा आणि नशिबाचा खेळ आहे, असं म्हटलं जातं. ते रिंकूच्या बाबतीत खरं ठरलं आहे.