आलिया भट्टने लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच शेअ...

आलिया भट्टने लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच शेअर केला सोशल मीडियावर फोटो, चाहत्यांनी मुलीची एक झलक दाखवण्याची केली विनंती (‘Mama’ Alia Bhatt Shares Her First Pic Since Daughter’s Birth, Fans Ask ‘How Are You And The Baby’)

अभिनेत्री आलिया भट्टने 6 नोव्हेंबरला मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर एका आठवड्याने तिने सोशल मीडियावर पहिला फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने गेल्या आठवड्यात आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला आहे. प्रसूतीनंतर अभिनेत्रीने आपला नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. शेअर केलेल्या या फोटोमध्ये, आलियाने हातात कॉफीचा मग धरुन कॅमेऱ्यासमोर पोज दिली आहे. फोटो जरी ब्लर असला तरी आलियाच्या चाहत्यांना तो खूप आवडला आहे.

पोस्ट केलेल्या पहिल्या फोटोमध्ये कॉफी मग स्पष्ट दिसत आहे. लाल रंगाच्या कॉफी मगवर मम्मा असे लिहिले आहे. हा फोटो पाहिल्यानंतर आलिया भट्टला आई झाल्याचा खूप अभिमान वाटत असल्याचे दिसते.

कॉफीच्या मगसोबत पोज देत असलेला हा फोटो अभिनेत्रीच्या वास्तू अपार्टमेंटचा आहे. फोटोमध्ये, कपवर फोकस केला असून आलियाने स्वत:ला ब्लर केले आहे. ब्लर फोटोमध्ये, अभिनेत्रीने काळी पँट आणि गुलाबी जॅकेट परिधान केलेली दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये आलियाने ‘ही मी आहे’ असे लिहिले आहे.

अभिनेत्रीच्या या फोटोवर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण अभिनेत्रीची आणि तिच्या मुलीच्या प्रकृतीची चौकशी करत आहेत, तर काहीजण मुलीचा फोटो शेअर करण्याची विनंती करत आहेत. एका चाहत्याने अभिनेत्रीला मम्मा भट्ट असेही म्हटले आहे. काहीजण अभिनेत्रीला तुझा पुढचा प्रवास खूप सुंदर व्हावा असा आशीर्वाद देत आहेत. आलियाच्या या पोस्टवर आतापर्यंत हजारो चाहते लाईक आणि कमेंट करत आहेत.