मल्लिका शेरावतचा उन्माद : बिकिनी घालून करतेय् य...

मल्लिका शेरावतचा उन्माद : बिकिनी घालून करतेय् योगा (Mallika Sherawat Performs Yoga In Bikini)

बऱ्याच काळापासून उफाड्या अंगाची मल्लिका शेरावत चित्रपटात दिसलेली नाही. पण आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून ती चर्चेत राहते. चाहत्यांशी संधान बांधून असते.

वयाच्या ४५ व्या वर्षी देखील मल्लिकाने आपला कमनीय बांधा राखून ठेवला आहे. कारण ती नियमितपणे व्यायाम करून फिटनेस राखते. तिच्या या कमनीय बांध्याची चाहते तारीफ करताना दिसतात.

आता तिने या व्यायामात ग्लॅमर आणण्याचा खटाटोप केला आहे. चक्क बिकिनी घालून तिने योगासने करत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ, सोशल मीडियावर प्रसारित केले आहे. आपल्या या उन्मादास अध्यात्माची जोड देत ती म्हणते, ‘पुढे झुकून योगा करणे ही माझी आवडती पोज आहे. त्याच्याने मला मानसिक शांती आणि आनंद मिळतो.’

तिच्या या बिकिनी घालून योगाचा आनंद तिचे चाहते पण घेत आहेत. एकजण म्हणतो, ‘काय पण लवचिक काया आहे’ दुसऱ्याने तिची तारीफ करत म्हटलंय्‌, ‘तुझं शरीर फारच सुंदर आहे.’ आणखी कुणी तिच्या फिगरची तारीफ केली आहे.

मल्लिका बऱ्याच दिवसांपासून गोव्यात रमली आहे. बिकिनीतील हा व्हिडिओ तिने गोव्याहूनच धाडला आहे.

‘मर्डर’ या चित्रपटातून अंगप्रदर्शन करत व सेक्सी दृश्ये करत मल्लिका नावारूपास आली. नंतर प्यार के साइड इफेक्ट्स, शादी से पहले, वेलकम, डबल धमाका अशा चित्रपटांमधून ती दिसली. शिवाय तिने जॅकी शॅन या मार्शल आर्ट प्रसिद्ध कलावंताबरोबर एक इंग्रजी चित्रपट देखील केला होता.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम