मालदीवला पोहोचताच दिशा परमारने दाखवला बोल्ड अवत...

मालदीवला पोहोचताच दिशा परमारने दाखवला बोल्ड अवतार, पिंक बिकिनीमधील दिशाला चाहत्यांनी म्हटले जलपरी… (Maldives Vacation: Disha Parmar Shares Bold Photos In Pink Bikini)

राहुल वैद्य आणि दिशा परमार हे नवीन जोडपं हनीमूनकरता मालदीवला गेले आहे. काल गुरुवारी राहुलचा वाढदिवसही त्यांनी तेथेच साजरा केला. त्यानंतर दिशाने तिचे जे काही बोल्ड फोटो शेअर्स केले आहेत, ते पाहून चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दर्शविल्या आहेत. त्यापैकी काहींनी म्हटलंय, मालदीवच्या स्वर्गीय वातावरणात इतकी सुंदर आणि हॉट दिसलीस तर पाहणाऱ्याचं काय होईल? तर कोणी तिला जलपरी असंही म्हटलं आहे.

Maldives Vacation, Disha Parmar, Bold Photos, Pink Bikini

दिशाने पिंक कलरची बिकिनी घालून पूलमध्ये उतरून ब्रेकफास्ट एन्जॉय करतानाचा आणि पतीसोबत रिलॅक्स होत असतानाचा फोटो शेअर करून कॅप्शन दिलीय – ‘खाऊन घे नाहीतर न्हाऊन घे…’

Maldives Vacation, Disha Parmar, Bold Photos, Pink Bikini
Maldives Vacation, Disha Parmar, Bold Photos, Pink Bikini

पिंक बिकिनी आणि ब्लू प्रिंटेड शॉर्टमध्ये दिशा अतिशय बोल्ड आणि हॉट दिसते आहे. त्यावर दिशाने व्हाइट आणि रेड फ्लोरल शीयर म्हणजे लाँग शर्ट घातले आहे. या बोल्ड अवतारातही दिशा गोड दिसते आहे. दिशाच्या बिनधास्त पोझेस पाहून दिशा व राहुल यांच्यावर हनीमूनचा रंग चढलेला दिसू लागला आहे. दोघंही रोमँटिक झाले आहेत.

Maldives Vacation, Disha Parmar, Bold Photos, Pink Bikini

दिशा आणि राहुल लग्नाला दोन महिने झाल्यानंतर मालदीवला हनीमूनसाठी गेले आहेत. दिशा सध्या ‘बडे अच्छे लगते है’ च्या दुसऱ्या पर्वामध्ये प्रियाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत तिच्यासोबत नकुल मेहता हा नायकाच्या भूमिकेत आहे. आठ वर्षांपूर्वी या दोघांनी ‘प्यार का दर्द मीठा-मीठा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. आणि दर्शकांनी त्यांच्या जोडीस बेहद पसंती दर्शवली होती.

Maldives Vacation, Disha Parmar, Bold Photos, Pink Bikini

आता बऱ्याच गॅपनंतर दिशाला काम मिळालं आहे आणि त्यासाठी ती आपल्या लग्नाला लकी मानते. राहुलसोबत लग्न केल्यानंतर तिला हा शो मिळाला असं ती म्हणते. सध्या ती आपल्या खऱ्या जोडीदारासोबत हनीमून एन्जॉय करत आहे.

Maldives Vacation, Disha Parmar, Bold Photos, Pink Bikini

लग्नानंतर पहिल्यांदाच दिशाला एवढ्या बोल्ड अवतारात पाहिलं जात आहे, शेवटी हा त्यांचा हनीमून आहे…

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम (सर्व फोटो)