फरहान – शिबानी यांच्या लग्नाच्या पार्टीत ...

फरहान – शिबानी यांच्या लग्नाच्या पार्टीत मलायकाचा ड्रेस बघून ट्रॉलर्स गर्जले – ‘लग्नसमारंभात स्विमिंग सूट कोणी घालतं का ग ?’ (Malaika Arora’s Super Bold Avtar At Farhan Akhtar – Shibani Dandekar’s Wedding Party)

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाच्या निमित्ताने रितेश सिधवानीने गुरुवारी रात्री एक पार्टी ठेवली. पार्टी होती नवदांपत्यासाठी. पण लोकांचं लक्ष वेधून घेतलं ते मलायका अरोरा व तिच्या ३ मैत्रिणींनी.

या पार्टीत मलायका अरोरा फारच बोल्ड अवतारात दाखल झाली. तिच्या अंगप्रदर्शन करणाऱ्या ड्रेसवरच लोकांच्या नजरा खिळल्या, तिनं काळ्या रंगाचा मोनोकिनी टाइप ड्रेस घातला होता. त्याला मांडी उघडी टाकणाऱ्या हाय स्लीट गाऊनने लेयर केलं होतं. त्या झिरझिरीत वस्त्रातून तिची आतील मोनोकिनी स्पष्ट दिसून येत होती.

मलायका सोबत तिच्या जीवलग मैत्रिणी करीना व करीश्मा कपूर आणि बहीण अमृता अरोरा होती. तसं पाहिलं तर  या साऱ्या जणी स्टायलिश वाटत होत्या. पण मलायकाचं हे रूप लोकांना भावलं नाही.

लोकांनी मलायकाला फारच ट्रॉल केलं. हिला बघून विचित्र कपडे घालणाऱ्या उर्फी जावेदची आठवण आली असं एकानं व्यक्त केलं. तर कित्येक लोक करवादले की, ‘लग्नसमारंभात कोणी स्वीमिंग सूट घालतं का गं?’ अंगप्रदर्शन करण्याच्या हेतूनेच मलायका असले कपडे घालते, असंही बोलणारे होते.

मलायकाच्या मानाने लोकांना करिश्माची स्टाइल आवडली. या चौघीजणींनी काळे ड्रेस घातले होते.
या पार्टीसाठी आलेले उत्सवमूर्ती – फरहान आणि शिबानी मात्र चांगलेच स्टायलिश व रुबाबदार वाटले.

Photo/Video Courtesy: Instagram/viralbhayani