सागर किनारे, मलायका बिकीनीत उभारे… नव्या ...

सागर किनारे, मलायका बिकीनीत उभारे… नव्या फोटोने चाहते झाले घायाळ( Malaika Arora’s Beach Beauty Photo Goes Viral )

अभिनेत्री मलायका अरोराला कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. तिने आपल्या नृत्य कलेने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनेकदा मलायकाचे असे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यावरुन नजर हटत नाही. आता पुन्हा एकदा मलायकाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

मलायकाने एक फोटो पोस्ट करुन पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष स्वत:कडे वळवले आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की मलायका समुद्रात ओल्या केसांवर मादक पोज देऊन उभी आहे. या फोटोत मलायकाने ब्लॅक अॅण्ड व्हाइट रंगाची टायगर प्रिंटची बिकिनी घातली आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये फक्त ‘ स्विम ? ‘ एवढेच लिहिले आहे. मलायकाचा हा हॉट फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मलायकाचे चाहते तिच्या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सौंदर्य आणि फिटनेससाठी ओळखली जाते. मलायकाकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज घेता येत नाही. मलायकाच्या डान्सचे तर लोक चाहते आहेतच पण तिची ड्रेसिंग स्टाइलसुद्धा लोकांना खूप आवडते. मलायकाची फॅशन अनेकदा ट्रेंडसुद्धा होत असते. मलायका आणि अर्जुन कपूर लवकरच कॉफी विथ करण या शो मध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत.

या शोमध्ये दोघेही त्यांच्या जीवनातील अनेक गुपिते उघडतील. मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चासुद्धा आहेत. मध्यंतरी एका मुलाखतीत ”मला अर्जुनसोबत म्हातारं व्हायचयं” असे मलायका म्हणाली होती. मलायकाचे चाहते त्या दोघांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.