इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकण्यासाठी एवढे पैसे घ...

इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकण्यासाठी एवढे पैसे घेते मलायका, ऐकून व्हाल थक्क (Malaika Arora Takes So Many Lakhs Of Rupees For A Post On Instagram, You Will Be Shoked To Know)

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराला तिच्या अभिनयासोबतच फिटनेससाठी सुद्धा ओळखले जाते. इंडस्ट्रीतील सर्वात फिट अभिनेत्रीच्या यादीत मलायकाचे नाव सर्वात आधी येते. काही दिवसांपूर्वीच तिने व तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने मोस्ट स्टाइलिश कपल हा पुरस्कार जिंकला. वयाच्या या टप्प्यातही मलायकाचे सौंदर्य आणि फिटनेस सध्याच्या नवोदित अभिनेत्रींना मागे टाकते. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या मलायकाच्या कमाईचे अनेक मार्ग आहे. पण ती इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकण्यासाठी किती लाख घेते हे तुम्हाला माहित आहे का ? नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.

मलायकाचा जन्म 23 ऑक्टोबर 1973 महाराष्ट्रातील ठाण्यात झाला. मलायकाने तिच्या करीअरची सुरुवात व्हिडिओ जॉकी म्हणून केली होती. तिने एक मुलाखतकार म्हणून क्लब एमटीव्ही सारखे कार्यक्रमही होस्ट केले आहेत. त्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये करीअर कऱण्यास सुरुवात केली. यादरम्यान तिने जाहिराती आणि काही अल्बममध्येही काम केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती 1998 मध्ये आलेल्या दिल से चित्रपटातील छैंया छैंया या गाण्यामुळे. या गाण्यातील तिच्या नृत्याने चाहत्यांना अगदी वेड लावले होते.

यानंतर तिने अनेक चित्रपटांमधील गाण्यांवर नृत्य केले. तिची सगळी गाणी सुपरहिट झाली. चित्रपटांनंतर तिने टीव्ही विश्वातही स्वत:ची वेगळी छाप पाडली. मलायका अरोरा टीव्हीसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांना वेड लावते. अनेकदा ती तिचे फिटनेसचे व्हिडिओ टाकून चाहत्यांना प्रेरित करत असते. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे, त्यामुळे तिला इन्स्टाग्रामवरील प्रत्येक पोस्टसाठी लाखो रुपये मिळतात.

इंडस्ट्रीतील सर्वात हॉट आणि फिट अभिनेत्रींच्या यादीत मलायकाचा समावेश असला तरी ती स्वत:ला फिटनेस दिवा म्हणण्याऐवजी फक्त दिवा म्हणणे पसंत करते. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार, मलायका अरोरा इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी 16 ते 20 लाख रुपये घेते.

मलायका अरोरा सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या वैयक्तिक जीवनामुळेच जास्त चर्चेत आहे. अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या रोमान्सच्या बातम्या बी टाऊनमध्ये सतत चर्चेत असतात. चाहत्यांनाही त्यांची जोडी खूप आवडते आणि ते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.