मलायका अरोराने शेअर केले ‘नो फिल्टर’...

मलायका अरोराने शेअर केले ‘नो फिल्टर’ पिक्चर्स (Malaika Arora Shares ‘No Filter’ Pictures)

ग्लॅमरस मलायका अरोराने तिच्या लेटेस्ट फोटोंनी इंस्टाग्रामवर आग लावली आहे आणि विशेष म्हणजे मलायकाने तिचे नो फिल्टर पिक्चर्स शेअर केले आहेत, त्यातही ती खूप हॉट व सुंदर दिसत आहे.

नेहमी परफेक्ट मेकअप आणि सेक्सी आउट फिट्समध्ये दिसणाऱ्या, मलायकाने कॅज्युअल कपड्यांमध्ये साधे सनकिस केलेले फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी देखील पसंती दर्शविली आहे.

मलायकाने फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे – नो फिल्टर. या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असताना, फराह खानने एक खास कमेंट केली आहे, फराहने लिहिले आहे – तू अशीच खूप चांगली दिसतेस…

मलायकाने लाइट प्रिंटेड कलरचा लाउंज वेअर घातला आहे आणि तिची पोजही खूप हॉट आहे. नूडल स्ट्रॅप आणि शॉर्ट ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या चित्रांमध्ये मलायकाची त्वचा पूर्णपणे निर्दोष आणि नैसर्गिक दिसत आहे. मलायकाचे केस मोकळे आहेत आणि ती विकेंडच्या रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे.

आजकाल मलायका अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्यामुळे सतत चर्चेत असते. मागे तिला माजी पती अरबाज खानसोबत विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते, दोघेही त्यांच्या मुलाला सी ऑफ करण्यासाठी विमानतळावर गेले होते.