मलयका अरोराची करोनाने बिघडवलेली फिगर तिने पुन्ह...

मलयका अरोराची करोनाने बिघडवलेली फिगर तिने पुन्हा कशी मिळवली? (Malaika Arora Reveals She Struggled to Work Out After COVID-19, Corona Broke Her Physically)

आपली हॉट फिगर आणि वैयक्तिक आयुष्य यामुळे बरेचदा चर्चेत असणारी मलयका अरोरा यावेळेस जरा वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. मलयकाने नुकतेच आपल्या फोटोंचा एक कोलाज शेअर केला आहे ज्यात तिने आपले करोनाग्रस्त असतानाचे आणि त्यातून बरे झाल्यानंतर तिच्या शरीरयष्टीत झालेल्या बदलाचे फोटो प्रदर्शित केले आहेत.  

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

करोनाची लागण झाल्यापासून ते करोनामुक्त होईस्तोवरच्या काळात मलयकाचं वजन बरंच वाढलं होतं. परंतु बरीच मेहनत घेऊन मलयकाने आपली पूर्वीची ताकद आणि सेक्सी फिगर परत मिळवली आहे. आपल्या फोटोंना कॅप्शन देत तिने, बिघडलेली फिगर पुन्हा मिळवणं सोपं नव्हतं, असं म्हटलं आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

मलयकाने करोनावर मात केल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा वर्कआऊट केला तेव्हा तिला आलेला अनुभव तिने आपल्या पोस्टमध्ये मांडला आहे. तिने लिहिलंय, “तुम्ही खूप लकी आहात… तुमच्यासाठी सगळं सोपं गेलं असेल. हे मी नेहमी ऐकते. मी आयुष्यातील अनेक गोष्टींसाठी आभारी आहे, मात्र यात नशीबाचा भाग खूप कमी आहे. शिवाय सोपं तर अजिबात नव्हतं. मी ५ सप्टेंबरला करोना पॉझिटिव्ह झाले. हे खूप त्रासदायक होतं. जे कुणी करोनातून बरं होणं सोपं समजतात, त्यांची एकतर प्रतिकारशक्ती तरी चांगली आहे किंवा त्यांना करोनाच्या परिणामांची कल्पना नाही. मी यातून गेले आहे आणि माझ्यासाठी हे अजिबात सोपं नव्हतं.”

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम

मलयकाने पुढे असं म्हटलंय, “करोनामुळे मी खूप कमकुवत झाले होते. दोन पावलं चालणंही मला मोठं काम वाटू लागलं होतं. फक्त बेडवरून उठणं किंवा खिडकीजवळ जाणं देखील मला मोठा प्रवास वाटू लागला. माझं वजन वाढलं होतं, मला अशक्तपणा आला होता. माझ्यात त्राणच उरले नव्हते. मी माझ्या कुटुंबापासून दूर होते. या आणि अशा अनेक समस्या… शेवटी २६ एप्रिलला माझा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. यावेळी आनंद झाला असला तरी शरीरात थकवा कायम होता.” असं मलायका म्हणाली. तसंच ती पुन्हा कधी फिट होईल हा प्रश्न तिला सतावत होताच.

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम

मलयका पुढे आपल्या पोस्टमध्ये लिहिते, “माझं पहिलं वर्कआउट खूप भयानक होतं. मी काहीच नीट करू शकत नव्हते. मी पूर्णपणे खचले होते. मात्र दुसऱ्या दिवशी स्वत:ला समजावलं. मी ठरवलं की मी पुन्हा पहिल्या सारखी बनेन. मग तीसरा. चौथा… पाचवा असे अनेक दिवस गेले. अखेर कोविड निगेटीव्ह येऊन ३२ आठवडे झाल्यानंतर आता मला पहिल्या सारखं वाटू लागलं आहे. आता मी पहिल्यासारखा वर्कआऊट करू शकते. व्यवस्थित श्वास घेऊ शकते… आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्याही स्वतःला बळकट अनुभवत आहे.”

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

मलयका अरोराने आपल्या पोस्टमध्ये तिला कायम सोबत देणाऱ्या अनेकांचे आभार मानले आहेत. ज्या चार शब्दांनी मला कायम प्रेरणा दिली ते म्हणजे आशा, याची की सर्व काही ठीक होईल. याच आशेने मला बळ दिलं. असं म्हणत मलयकाने जगावर आलेलं हे संकट लवकर दूर होवो अशी प्रार्थना केली आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

गेल्यावर्षी करोनावर मात केल्यानंतर मलयकाने तिचा करोनानंतरचा प्रवास सोशल मीडियावर शेअर केला होता. तिने त्यात सांगितले होते की, एका दिवसात ती १८ तास झोपत होती आणि फक्त जेवणासाठी उठायची. औषधांची तीव्रता अधिक असल्याने डॉक्टरांनीच तिला आराम करण्याचा सल्ला दिला होता.