मलायका अरोराचा लेटेस्ट जिम लूक समोर येताच लोक म...

मलायका अरोराचा लेटेस्ट जिम लूक समोर येताच लोक म्हणाले, आंटीजी नमस्ते…! (Malaika Arora Gets Trolled And Age-Shamed For Her Latest Gym Look, People Say- Aaj Asli Shakal Dikha Di Cameraman Ne Galati Se)

मलायका अरोराची हॉट बॉडी आणि फिटनेस पाहून ती एका मोठ्या मुलाची आई आहे असे कोणीच म्हणू शकत नाही. वय होऊनही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती जिम आणि योगा दोन्ही करते.  पापाराझी दररोज जिम बाहेर किंवा तिच्या घराबाहेर  तिचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी थांबलेले असतात.

अलीकडे मलायका जिमला जात होती तेव्हा तिने चमकदार निळ्या रंगाचे पॅण्ट आणि ब्रालेट असे जिम वेअर घातले होते. त्यामध्ये तिचे कमावलेले शरीर स्पष्ट दिसत होते, पण जसे मलायकाच्या चेहऱ्याचे फोटो व्हायरल झाले तसे लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

मलायकाची ट्रोलिंगची शिकार होण्याची ही पहिलीच वेळ नाही, तिला अनेकदा तिच्या हॉट आउटफिट्समुळे किंवा अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे ट्रोल केले जाते. अलीकडेच तिने म्हटले होते की, एक काळ असा होता जेव्हा ट्रोलिंगमुळे माझा आत्मविश्वास डळमळीत झाला होता, परंतु मी खूप कणखर आहे आणि आता मला त्याचा काही फरक पडत नाही.

मलायकाच्या या जिम लूकवर युजर्स म्हणाले की ही नेहमीच अंगप्रदर्शन करत फिरते आणि श्वास आत रोखून स्वतःला फिट दाखवण्याचा प्रयत्न करते. मलायकाच्या चेहऱ्याकडे पाहून इतर युजर्स म्हणाले, आज कॅमेरामनने तिच्या चेहऱ्याचा क्लोज-अप दाखवला आहे, ती म्हातारी झाली आहे… एका युजरने कमेंट केली की, अर्जुन कपूरने या म्हाताऱ्या मावशीमध्ये काय पाहिलं ते मला कळत नाही… एकाने म्हटलं की तिचे डोळे सुजल्यासारखे वाटत आहेत ती नक्कीच रडत बाहेर आली असणार.

काहींनी तिला आंटीजी नमस्ते, तर काहीजण तिला म्हातारी म्हणत ट्रोल करत आहेत. मात्र, अनेकजण मलायकाच्या फिटनेस आणि हॉट फिगरचे कौतुकही करत आहेत.