लग्न न करताच मुलीची आई झालेल्या मारी गिलचा , रि...

लग्न न करताच मुलीची आई झालेल्या मारी गिलचा , रिलेशनशिप बाबत बिनधास्त कबुली जबाब (Mahi Gill Frankly Speaks About Her Relationship And Becoming A Mother Without Marriage)

संजय दत्त सह ‘साहब बीवी और गँगस्टर ३’ मधून चमकलेली माही गिलने आपल्या खासगी जीवनाबद्दल एका मुलाखतीत बिनधास्त कबुलीजबाब दिला आहे. लग्न न करताच एका मुलीची आई बनलेल्या माहीने या मुलाखतीत आपल्या रिलेशनशिपचा पुरस्कार केला आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
माही गिलने अद्याप लग्न केलेले नाही पण ती ५ वर्षांची मुलगी वेरोनिकाची आई झाली आहे. माझ्या मुलीला स्वावलंबी बनविण्याचा माझा निर्धार आहे. तिला चांगलं शिक्षण मिळावं व इतर क्षेत्रात तिनं नाव कमवाव, अशी आपली इच्छा असल्याचं महिने या मुलाखतीत सांगितले आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
आपण रिलेशनशिप मध्ये आहोत. लग्न न करताच एका मुलीला जन्म दिल्याचा मला अभिमान आहे, असं माही म्हणते. तिची मुलगी ऑगस्ट महिन्यात ५ वर्षांची झाली आहे. लग्न करण्याची आपल्याला आवश्यकता वाटत नाही. असं ती सांगते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
लग्नाशिवाय मूल झालं तर काय बिघडलं? – हा माहीचा सवाल आहे. लग्न हा एक सुंदर अनुभव आहे, हे मान्य, पण त्याच्या बेडीत अडकायचं कि नाही, ही ज्याची त्याची आवड आहे, असा माहीचा फंडा आहे. आपला लिव्ह-इन पार्टनर आणि मुलीसह माही गोव्यात राहते. कामासाठी ती मुंबईला येते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
माहीच्या कामकाजाबाबत बोलायचं झालं तर ती सलमान खानच्या ‘दबंग २’ मध्ये अरबाज खानच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. ही भूमिका छोटी होती, याची तिला खंत आहे. कारण नंतर तिला छोटया भूमिकांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
महीला ‘देव डी’ या चित्रपटातून नाव मिळाले. ‘खोया खोया चांद’, ‘गुलाल’, ‘पानसिंह तोमर’, ‘जंजीर’ आदी ३३ चित्रपटांमधून माहिने कां केले आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम