‘शाहरुख खान नवीन काहीच करत नाही’ &#...

‘शाहरुख खान नवीन काहीच करत नाही’ – महेश मांजरेकर यांची टीकाटिप्पणी (Mahesh Manjrekar’s Criticism On Shahrukh Khan; Says He Is Not Doing Anything New)

बॉलिवूड आणि मराठी चित्रसृष्टीतील सुप्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर, हे कोणत्याही विषयावर आपली परखड मते मांडण्याबाबत प्रसिद्ध आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अंतिम: द फायनल ट्‌रुथ’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. सलमान खान त्याचा नायक आहे. सोबत आयुष शर्मा आहे. या चित्रपटाबद्दल व त्यातील कलाकारांबद्दल बोलत असताना त्यांनी शाहरूख खानबाबत जे विचार मांडले, त्याने चर्चा वाढली.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

महेश मांजरेकर यांना वाटतंय्‌ की शाहरूख खान आपल्या टॅलेन्टला न्याय देऊ शकत नाहीये. कारण तो काहीच नवं करत नाही. त्यानं आपल्या कोषातून बाहेर यावं. शाहरूखचा आत्मविश्वास दांडगा आहे, असं मांजरेकरांना वाटतं.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

या मुलाखतीच्या दरम्यान ते म्हणाले, “तो केवळ या भ्रमात असतो की, माझा चित्रपट चालला. मी लव्हर बॉय आहे. या कोषातून त्यानं बाहेर यायला हवं.”

रणबीर कपूर आणि रणवीर सिंह ज्या प्रकारच्या भूमिका करतात, तशाच भूमिका शाहरूख करतो आहे. मग लोक त्याला कशाला पाहतील? ही भूमिका शाहरूख खानसाठीच होती, असं आपण म्हणावं, असं लोकांना वाटतं. आपल्या या कोषातून शाहरूख बाहेर पडला तरच तो काही चांगलं करू शकेल, असं मांजरेकर यांचं मत आहे.

रणवीर सिंहकडे संजय दत्तसारखा चार्म आहे. तर रणबीर कपूर उत्कृष्ट अभिनेता आहे. असं सांगून सलमान खान आपल्या कामात वाकबगार आहे, अन्‌ आयुष शर्माचं भविष्य उज्ज्वल आहे, अशी टिप्पणी महेश मांजरेकर यांनी या मुलाखतीत केली आहे.