महेश भट्ट यांच्यावर झाली ह्रदयशस्त्रक्रिया, आलि...

महेश भट्ट यांच्यावर झाली ह्रदयशस्त्रक्रिया, आलियाच्या सावत्र भावाने दिली माहिती (Mahesh Bhatt Undergoes Heart Surgery : Alia Bhatt’s Step- brother revealed This News)

बॉलिवूडमध्ये वेगवेगळे परिवार खूप प्रसिद्ध आहेत. या परिवारातील अनेक पिढ्या सिनेसृष्टीत कार्यरत असून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यातीलच एक कुटुंब म्हणजे भट्ट परिवार. पण सध्या या कुटुंबात चिंताजनक वातावरण आहे. महेश भट्ट यांच्यावर काही दिवसांपूर्वीच ह्रदयशस्त्रक्रिया करण्यात आली. याबद्दलची माहिती आलियाचा सावत्र भाऊ राहुल भट्टने मीडियाला दिली.

Mahesh Bhatt to make his OTT debut with a show on famous Sikhs

राहुलने सांगितले की, काही दिवसांपूर्वी महेश भट्ट यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Mahesh Bhatt's biopic on small screen

राहुल पुढे म्हणाला, साधारण आठवड्याच्या सुरुवातीलाच महेश भट्ट यांच्या छातीत दुखत होते. हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांची प्रकृतीही पूर्वीपेक्षा स्थिर आहे.

महेश भट्ट यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात शेवटी त्यांचा सडक 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांची प्रमुख भूमिका होती.