महेश भट्टने या कारणामुळे आपल्या चित्रपटातून कतर...

महेश भट्टने या कारणामुळे आपल्या चित्रपटातून कतरीना कैफला दाखवला होता बाहेरचा रस्ता (Mahesh Bhatt Showed Katrina Kaif The Way Out Of His Film, The Reason Is Astonishing)

कतरिना कैफ बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. बिग बजेट चित्रपटांमध्ये काम केलेल्या कतरिना कैफच्या चाहत्यांची संख्याही जबरदस्त आहे. अनेक मोठे चित्रपट निर्माते तिला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी रांगेत उभे असतात. कतरिनाच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीला महेश भट्ट यांनी कतरिनाला आपल्या चित्रपटात कास्ट केले होते. पण नंतर त्यांनी तिला आपल्या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला. आज आपण कतरिना भट्ट कॅम्पची नायिका का होऊ शकली नाही हे जाणून घेणार आहोत.

कतरिना कैफने 2003 मध्ये ‘बूम’ या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयातील करीअरला सुरुवात केली. या चित्रपटात ती अतिशय बोल्ड भूमिकेत दिसली होती.या चित्रपटात तिच्यासोबत मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी सुद्धा काम केले होते. पण तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

मुळची ब्रिटीश वंशीय असलेली कतरिना आता बऱ्यापैकी हिंदी बोलते. पण बुम चित्रपटातील तिचे शब्दोच्चार आणि  हावभाव यामुळे तिला खूप ट्रोल केले गेले होते. त्याचा परिणाम तिचा पुढील चित्रपट सायावर झाला. महेश भट्ट यांनी कतरिनाला त्यांच्या साया या चित्रपटासाठी साइन केले होते. पण बुममधील तिचा अभिनय पाहून तिच्या जागी तारा शर्माला साइन केले गेले.

कतरिना कैफ ही ब्रिटिश-भारतीय वंशाची अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये ती आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. कतरिनाने केवळ हिंदी चित्रपटातच नव्हे तर तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. कतरिना कैफच्या करिअरची सुरुवात वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी झाली. या वयात तिने पहिल्यांदा मॉडेलिंग केले. मॉडेलिंगमध्ये तिने चांगले नावही कमावले होते.

कतरिना केवळ चित्रपटांमध्येच सक्रिय नाही तर ती अनेक ब्रँड्सचे प्रतिनिधित्व सुद्धा करते. त्यासाठी ती खूप मोठी रक्कम फी म्हणून आकारते. मिळालेल्या माहितीनुसार कतरिना एका चित्रपटासाठी 10 ते 11 कोटी रुपये घेते. तिचा स्वतःचा ब्युटी ब्रँडही आहे, ज्याचे नाव ‘के ब्युटी’असे आहे. या ब्रँडची ती मालक असून तिने नायका या शॉपिंग वेबसाइटमध्ये गुंतवणूक केली आहे. अनेक सेलिब्रेटी तिचा ब्रँड वापरतात.