अभिनेत्री महिप कपूरचा दीपिका-रणवीर, कतरिना-विक्...

अभिनेत्री महिप कपूरचा दीपिका-रणवीर, कतरिना-विक्की आणि आलिया-रणबीर या जोडप्यांना मजेदार सल्ला- म्हणते- ‘गुड सेक्स, गुड सेक्स, गुड सेक्स’ (Maheep Kapoor Gives Hilarious Marital Advice To Deepika-Ranveer, Vicky-Katrina And Alia-Ranbir, Says- ‘Good Sex, Good Sex, Good Sex’)

बॉलिवूड निर्माता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण-7’ या शोमध्ये महीप कपूरने बॉलिवूडचे पॉवरफुल कपल दीपिका-रणवीर, आलिया-रणबीर आणि विक्की-कतरिना यांना असा काही मजेशीर सल्ला दिला आहे जो ऐकून तुम्हालाही हसू येईल. महीप कपूर, गौरी खान आणि भावना पांडे यांनी चित्रपट निर्माता करण जोहरचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण-7’ मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी करण जोहरने महीप कपूरला दीपिका-रणवीर, आलिया-रणबीर आणि विक्की-कतरिना यांना सुखी वैवाहिक जीवनाचा सल्ला काय देशील असे विचारले.

त्यावर महिपने उत्तर दिले की, त्यांना सल्ला देणारी मी कोण, पण एवढे नक्की म्हणेन की, गुड सेक्स, गुड सेक्स आणि गुड सेक्स, आणि आपलं कपड्यांचे कपाट कोणाशीही शेअर करु नका.

जेव्हा करणने रणबीर-आलियाबद्दल विचारले तेव्हा महीपने पुन्हा उत्तर दिले – गुड सेक्स, गुड सेक्स आणि गुड सेक्स तसेच बाळ झाल्यावर त्याची सर्व कामे दोघांनी समान वाटून घ्यावीत.

त्यानंतर करणने महीपला विकी कौशल आणि कतरिना बद्दल विचारले तेव्हा महीपने लगेच उत्तर दिले – गुड सेक्स, गुड सेक्स आणि गुड सेक्स… विकीसोबत कतरिना आहे, त्यामुळे मला वाटते सर्व ठीक आहे.

शोमध्ये करण जोहरने महीप कपूरला तिच्या वैवाहिक जीवनाविषयी अनेक प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची महीपने मनमोकळेपणाने उत्तरे दिली. महीपने सांगितले की कपूर कुटुंब हे बॉलिवूडमधील मोठ्या कुटुंबांपैकी एक आहे. त्यामुळे अनेकवेळा तिला आपल्या वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागला आहे.